तरुण भारत

पिरनवाडी येथे तरुणीची आत्महत्या

राहत्या घरी गळफास घेऊन संपविले जीवन

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

रामदेव गल्ली, पिरनवाडी येथील एका तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे.

ऐश्वर्या सुनील पोटे (वय 20) असे त्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. ऐश्वर्या मूळची शहापूरची असून गेल्या दहा वर्षांपासून ती पिरनवाडी येथील आपल्या मामाच्या घरी राहत होती. गेल्या एक वर्षापासून एका खासगी कंपनीत काम करीत होती. बुधवारी सकाळी 9 ते 10.30 या वेळेत तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करीत आहेत. तरुणीच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.   

Related Stories

मफतलाल फॅमिली शॉप ‘गौतम’चा वर्धापन दिन साजरा

Amit Kulkarni

खानापुरात भाजपच्यावतीने सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली

Patil_p

बागलकोट जिल्हय़ात 6 जणांना बाधा

Patil_p

कर्नाटक राज्य भाजप ओबीसी मोर्चा सचिवपदी किरण जाधव

Patil_p

आपण सुजाण कधी होणार?

Omkar B

गणपती बाप्पा मोरया…कोरोनाचे संकट दूर करा!

Patil_p
error: Content is protected !!