तरुण भारत

रत्नागिरी विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी खासदार प्रभू प्रयत्नशील

प्रतिनिधी / रत्नागिरी

कोकणच्या विकासासाठी अपरिहार्य असलेले रत्नागिरी विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी खासदार सुरेश प्रभू यांनी केंद्रीय नागरी विमानन मंत्रीहरदीप पुरी यांना पत्र पाठवून पाठपुरावा केला आहे.

Advertisements

नैसर्गिक सौंदर्य व साधनसामुग्रीचे वरदान असलेल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यांमध्ये पर्यटन, फलोत्पादन व अन्नप्रक्रिया अशा अनेक क्षेत्रांची भरभराट करण्याची अफाट क्षमता आहे. रस्ते व रेल्वेमार्गानंतर विमानतळाची उपलब्धता या दोन्ही जिह्यांच्या शाश्वत, समतोल व समन्यायी अर्थसामाजिक विकासाला मोठी चालना देऊ शकेल.

उडान योजनेअंतर्गत 5 मार्च 2019 रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.  रत्नागिरी-मुंबई-रत्नागिरी विमान वाहतुकीसाठी उडान 3.1 योजनेअंतर्गत बोलीही मागवल्या गेलेल्या आहेत. सिंधुदुर्ग विमानतळासोबतच रत्नागिरी विमानतळाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी विनंती प्रभू यांनी केंद्रीय नागरी विमान मंत्री यांना केली आहे. या विनंतीची तत्परतेने दखल घेऊन रत्नागिरी विमानतळ प्रकल्पाला आवश्यक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Stories

सुकिवलीत बागायतीस आग, 1 लाखाची हानी

Patil_p

रत्नागिरी : एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

triratna

लांजा-कुंभारवाडी परिसरात दोन बिबटय़ांचा वावर

Patil_p

सरपंचांनाच स्वाक्षरी शिकवण्याचे आदेश!

Patil_p

रत्नागिरी : लॉकडाऊन असतानाही दापोलीत पर्यटक

triratna

तेरवण येथे गोठय़ाला आग, लाखोंचे नुकसान

Patil_p
error: Content is protected !!