तरुण भारत

रत्नागिरीत बनवली ‘आयएनएस खुकरी’ची प्रतिकृती

प्रतिनिधी / रत्नागिरी

1971 च्या युद्धामधील ‘आयएनएस खुकरी’ या युद्धनौकेची 32 फुटी प्रतिकृती (मॉडेल) दीव दमण येथे मोठय़ा दिमाखात स्थापन करण्यात आहे. रत्नागिरीतील जुवे गावच्या सचिन चव्हाण या तरुणाने ही प्रतिकृती सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर साकारली. लाकूडकाम, फायबर, रंगकाम आणि सर्व काम जुवे येथील घरातच केले आहे. रत्नागिरीकरांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी या तरुणाने केली असून हे मॉडेल घेऊन चव्हाण व सहकारी आज दमणला रवाना झाले.

Advertisements

खुकरीला पाकिस्तानच्या पाणबुडीने बुडवले होते. त्यात पॅप्टन महेंद्रनाथ मुल्लांसह शेकडो शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ दीव येथे स्मारक उभारले. तेथे 22 डिसेंबरला संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते या मॉडेलचे अनावरण होणार आहे. मुंबईत नेव्हलमध्ये चव्हाण शिप मॉडेलिंग इन्स्ट्रक्टर आहेत. आयएनएस खुकरी या युद्धनौकेचे फक्त काही फोटो शिल्लक होते. नोकरीपूर्वी अशी अनेक मॉडेल्स बनवण्याची खासियत माहिती असल्यामुळेच अशी हुबेहूब प्रतिकृती साकारण्यासाठी त्यांना पोर्ट व नेव्हलद्वारे विचारणा झाली. त्यांनी लॉकडाउनच्या काळात गावी येऊन कामाला सुरवात केली. सुमारे सहा महिने यासाठी लागले. दररोज छोटे पार्ट बनवणे, मरीन प्लाय, देवदारचे लाकूड, फायबर, रंगकाम अशी विविध कामे सुरू केली. याकरिता सुमारे आठ ते दहा लाखांचा खर्च झाला आहे.

सचिन चव्हाण यांनी 1997 मध्ये बारावीत असताना एनसीसीमध्ये शिप मॉडेल्स बनवण्यात पदके प्राप्त केली. त्यावेळेपासून आतापर्यंत शिप मॉडेलिंग इन्स्ट्रक्टर शशिकांत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. नोकरी नसल्यामुळे शिप मॉडेल्स बनवण्यासाठी फर्म स्थापन केली. त्याद्वारे शिपसाठी 800 कीट बनवून दिली. 5 ते 6 फुटाची 250 मॉडेल्स बनवली. 2006 मध्ये 19 फुटाचे आयएनएस त्रिशूळचे मॉडेल बनवले होते. आता कारवारमधून 40 फूट मॉडेल बनवण्याचे काम मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

खुकरकरिता मयूर वाडेकर, अक्षय देवरूखकर, मुंबईतील सुबोध जयस्वाल, विशाल राम यांनी काम केले. मुंबई नेव्हलचे कमांडिंग ऑफिसर यांचे मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य लाभल्याने या कामासाठी वेळ देता आला. मार्गदर्शक शशिकांत जाधव, मनिष सुर्वे व कुटुंबीय, सरपंच दीपक सुर्वे, संतोष चव्हाण, मंगेश चव्हाण, सुधाकर चव्हाण व मित्रमंडळींचे सहकार्य लाभल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

शिप मॉडेलिंगमध्ये भरपूर संधी

शिप मॉडेल्स बनवण्यासाठी रत्नागिरीतील स्थानिकांनी पुढाकार घ्यायला हवा. दिवसाला 12 ते 14 तास काम, मेहनत, अंगाला रंग लागतोच. याची तयारी असेल तर चांगली संधी या व्यवसायात असल्याचे सचिन चव्हाण यांनी सांगितले.

Related Stories

रत्नागिरी : दापोलीत आ. योगेश कदम घेणार पंचायत समितीची आढावा बैठक

triratna

मजुरांना नेपाळला नेणारी खासगी आरामबस उलटली

Patil_p

बोगस ई-पास प्रकरण गुहागर तालुक्यातून मनसेच्या कार्यकर्त्याला अटक

triratna

रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावर नाणीजजवळ अजरत्र वृक्ष कोसळला

triratna

कोतापूर येथे शॉक लागून वायरमनचा मृत्यू

triratna

रत्नागिरीत लॉकडाऊनमध्येही मटका धंदा तेजीत

Patil_p
error: Content is protected !!