तरुण भारत

ड्रग्स प्रकरणी निर्माता करण जोहरला समन्स

ऑनलाईन टीम / मुंबई : 


बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी एनसीबीने निर्माता करण जोहरला समन्स बजावले आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज केस संबंधी व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत करण जोहरकडे एनसीबीने माहिती मागवली आहे. याची माहिती देण्यासाठी करण जोहरने प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक नाही. तो आपल्या प्रतिनिधीला पाठवू शकतो असेही एनसीबीने स्पष्ट केले आहे.  


2019 सालच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओत करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीत अनेक बॉलिवूडचे स्टार्स उपस्थिच होते असं दिसतंय.


अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर एनसीबीने बॉलिवूडमध्ये पसरलेल्या ड्रग्जच्या जाळ्याबद्दल तपास करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक लोकांना अटक केली आहे.


दरम्यान, करण जोहरच्या घरी झालेल्या या पार्टीची तक्रार शिरोमणी अकाली दलाचे नेते मंजिंदर सिंह सिरसा यांचे चे प्रमुख राकेश अस्थाना यांच्याकडे केली होती.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत दिपिका पादुकोन, अर्जुन कपूर, विकी कौशल, वरुण धवन, रणबीर कपूर, मलाइका अरोरा आणि इतर अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते.

Related Stories

द सुसाइड स्क्वाडचा ट्रेलर प्रदर्शित

Patil_p

रेड नोटीसमध्ये इंटरपोलची कार्यपद्धती

Patil_p

संजय दत्त कोकीलाबेन रुग्णालयात दाखल; मान्यता दत्त म्हणाली…

pradnya p

दबंग खानच्या ड्रायव्हरसह स्टाफमधील दोघांना कोरोना; सलमान आयसोलेट

pradnya p

किचनपासून मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास

Patil_p

ड्रग्ज कनेक्शन : शौविक चक्रवर्तीकडून पुन्हा एकदा जामीनासाठी अर्ज

pradnya p
error: Content is protected !!