तरुण भारत

बेळगुंदी ग्रामपंचयतीमध्ये 54 उमेदवार रिंगणात

दोन उमेदवारांची बिनविरोध निवड , निवडणूक होणार अटीतटीची

वार्ताहर/ किणये

Advertisements

बेळगुंदी ग्रामपंचायतीमध्ये 54 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात उमेदवार जोरदार प्रचार करीत आहेत. बेळगुंदी ग्रामपंचायतीमध्ये बेळगुंदी, सोनोली व बोकनूर या तीन गावांचा समावेश आहे. तीन गावांमध्ये मिळून सात वॉर्ड असून 19 जागा आहेत. यापैकी सोनोली गावातील वॉर्ड क्र. 5 मधून एका जणांची बिनविरोध तसेच बोकनूर गावातील वॉर्ड क्रमांक 7 मधील एका महिलेची बिनविरोध निवड झाली आहे.

पश्चिम भागातील बेळगुंदी ग्राम पंचायतीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या गावात प्रारंभी गावपंच कमिटी, देवस्थान पंचकमिटी व गावातील प्रमुख यांनी बैठक घेऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र वडिलधाऱया मंडळींच्या प्रयत्नांना यश आले नसल्यामुळे बेळगुंदी ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होणार आहे.

उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेऊ लागले आहेत. एकूण 19 जागांपैकी दोघाजणांची बिनविरोध निवड झाली असल्यामुळे 56 उमेदवारांमधील 54 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीत बाजी मारण्यासाठी उमेदवारांसह त्यांचे समर्थक सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

Related Stories

सिध्दारूढ स्वामी स्पोर्ट्स क्लब विजयी

Patil_p

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला अटक

Patil_p

विद्युत खांबांमुळे रस्ता बनला अरुंद

Patil_p

कुडचीत पोलीस बंदोबस्त कायम

Patil_p

ऊस पुरवठा न केलेल्या सभासदांची साखर बंद करणार

Patil_p

विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!