तरुण भारत

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण

पॅरिस

 फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. प्राथमिक लक्षणे दिसून आल्यानंतर चाचणी करून घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे राष्ट्राध्यक्ष मॅक्रो हे पुढील सात दिवस सर्वांपासून वेगळे राहतील. त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. आयसोलेशनमध्ये असले तरीही आपल्या कामावर त्यांची नजर असणार आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांपूर्वी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जाएर बोल्सनारो यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता.

Advertisements

Related Stories

नवाज शरीफ गुन्हेगार घोषित

Patil_p

गलवान चा संदेश

Amit Kulkarni

प्रचंड यांनी मागितली भारत, अमेरिकेकडून मदत

Patil_p

फ्रान्सच्या चर्चमध्ये 3 लाख मुलांचे लैंगिक शोषण

Patil_p

कार्यकाळ संपण्यापूर्वीच ट्रम्प यांची फजिती

Patil_p

पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्याची सिंधची मागणी

Patil_p
error: Content is protected !!