तरुण भारत

भारत दोन वर्षात टोलनाकामुक्त होणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारत सरकार रशियाच्या मदतीने लवकरच देशात वाहनांसाठी GPS सिस्टीम आणणार आहे. त्यामुळे येत्या 2 वर्षात वाहनांचा टोल केवळ बँक लिंक्ड  खात्यातूनच वसुल केला जाईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

एसोचॅम फाउंडेशन वीक कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, देशभरातील वाहनांसाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. येत्या 2 वर्षात भारताला टोलनाकामुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी भारत रशियाच्या मदतीने वाहनांसाठी GPS सिस्टीम आणत आहे. सर्व जुन्या वाहनांमध्ये GPS सिस्टम टेक्नोलॉजी लावण्यासाठी काम सुरू आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर वाहनधारकांच्या बँक लिंक्ड खात्यातूनच टोल वसूल केला जाईल.

वाहनांमधील GPS प्रणालीमुळे देश टोलनाकामुक्त होईल. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) टोलमधील उत्पन्न पाच वर्षात 1.34 ट्रिलियनपर्यंत वाढू शकते, असेही गडकरी म्हणाले.

Related Stories

आयएस दहशतवाद्यांपासून कर्नाटक-केरळला धोका

Patil_p

आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक पॅकेज देण्याची गरज : शरद पवार

prashant_c

फॉग गेम 26 जानेवारीपासून उपलब्ध

Patil_p

6 महिन्यांत 175 वायू गुणवत्ता केंद्रे स्थापन करा

Patil_p

तुर्तास चीनमध्ये जाणे टाळा; केंद्र सरकारच्या नागरिकांना सूचना

prashant_c

रॉचा आयएसआयला संदेश अन् अभिनंदन यांची मुक्तता

Amit Kulkarni
error: Content is protected !!