तरुण भारत

हिरो नंबर 1 गोविंदा ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर

ऑनलाईन टीम / मुंबई :

‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ हा कार्यक्रम थोड्याच काळात प्रेक्षकांचा आवडता झाला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेली नृत्यातली प्रतिभा प्रेक्षकांना या मंचावर पाहायला मिळते आहे.

Advertisements

येत्या आठवड्यात 21आणि 22 डिसेंबरला ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’मध्ये हिरो नंबर वन गोविंदा उपस्थित असणार आहे. गोविंदाच्या येण्यानी स्पर्धक आणि गुरू यांच्यातला उत्साह वाढला आहे. या आठवड्यात होणारी सगळी सादरीकरणं गोविंदाला समर्पित असणार आहेत. गोविंदासाठी खास ट्रिब्यूटही सर्व स्पर्धक आणि त्यांचे गुरू यांनी सादर केलेले पाहायला मिळणार आहे. 

गोविंदाच्या गाण्यांवर आणि गोविंदाच्या स्टेप्स वापरून केलेली नृत्यं पाहून गोविंदाही भारावून गेला. एवढंच नाही तर मंचावर येऊन त्यानी स्पर्धकांबरोबर नृत्यही केलं. 

गोविंदाच्या आयकॉनिक स्टेप्स नृत्याच्या महामंचावर  प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. धर्मेश सर स्वतः गोविंदाचे चाहते असल्यानी गोविंदाच्या उपस्थितीनं तेही भारावून गेले होते. स्पर्धकांमधील आर्य डोंगरे याच्या आजोबांनी जमवलेल्या गोविंदाच्या आईच्या आवाजातली दुर्मीळ चित्रफीतही  ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ टीमकडून भेट म्हणून देण्यात आली. 

कार्यक्रमातला हा  बाद फेरीचा पहिलाच आठवडा आहे. या भागात टॉप 12 पैकी कोणता एक स्पर्धक  बाद होणार, हे कळणार आहे. 

Related Stories

18 सप्टेंबरला रिलीज होणार फरहानचा ‘तुफान’

tarunbharat

संजय लीला भन्साळींसोबत मयूर वैद्यला करायचेय काम

Patil_p

पलक तिवारीच्या ‘बिजली बिजली’चा फर्स्ट लुक

Amit Kulkarni

अक्षय कुमारला रुग्णालयातून डिस्चार्ज!

Rohan_P

यश कधीच कायमस्वरुपी नसते!

Patil_p

मातृत्वानंतर कल्कि कोचलिनला आले होते नैराश्य

Patil_p
error: Content is protected !!