तरुण भारत

घोषणा नको,आता कार्यवाही करा – समरजितसिंह घाटगे

महाविकास’ आघाडी सरकारला सवाल :, बाचणी येथे शिवार संवाद कार्यक्रम

व्हनाळी / वार्ताहर

Advertisements

शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान व वीजबिल माफी बाबत सरकार घोषणा फक्त करत आहे. भुलथाप देत महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान दिले नाही. कर्जमाफी संदर्भात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळे त्यांची कर्जमाफीची घोषणा ही पोकळ वल्गनाच म्हणावी लागेल आत्ता घोषणा नको ? प्रत्यक्ष कार्यवाही करा. असा निर्वाणीचा इशारा शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी महाविकास’ आघाडी सरकारला दिला.

बाचणी. ता कागल येथे शिवार संवाद कार्यक्रमावेळी ते बोलत होते. समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, वीज बिल माफीबाबत शासनाने घुमजाव केल्यामुळे ग्राहकांनी ती भरलेली नाहीत. उत्पन्नाचे स्त्रोत थांबल्याने महावितरण कंपनी अडचणीत आली आहे. कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाबाबत सुद्धा शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड न केल्यास सोसायट्यासुद्धा आर्थिकदृष्ट्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. ही बाब गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने घोषणा थांबवाव्यात आणि प्रत्यक्ष कार्यवाही करावी. असे ते म्हणाले

यावेळी बाबासाहेब पाटील, संजय पाटील, प्रताप पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, धैर्यशील इंगळे, भूषण पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाहूचे माजी संचालक आर. के. पाटील, बाळासाहेब गुजर, ज्ञानदेव पाटील, वसंतराव पाटील, दिलीप पाटील, बाळासाहेब वारके, पंडित पाटील, नामदेव बल्लाळ, दिनकर वाडकर, विकास पाटील, यांच्यासह शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्जमाफी प्रोत्सहान अनुदान,अतीवृष्टीमुळे झालेले शेतीपिकाचे नुकान तसेच वीजबिल माफी, आशा विविध मागण्या करत शेतक-यांना दिवसेदिवस झगडावे लागत आहे तेव्हा आता तरी हे थांबवा अनखी किती दिवस शेतक-यांन घोषनांचे गाजर दाखवणार असा सवाल राजे समरजितसिंह घाटगे यांनी आपल्या भाषणातून यावेळी व्यक्त केला.

शिवार संवाद ची नोंद थेट अधिवेशनात

बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, समरजितराजे शेतकऱ्याच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा समजून घेऊन त्या सरकारपर्यंत पोहोच करीत आहेत. त्याबाबतचा दाखला देताना त्यांनी कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथी मगर कुटुंबियांचा अन्यायकारक वाढीव वीज बिलाचा दाखला दिला ज्याची चर्चा दोन दिवसांपूर्वी अधिवेशनात झाली. त्यामुळे त्यांनी समर्जीतसिंह घाटगे यांच्या शिवार संवाद उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर, 1014 पॉझिटिव्ह, 12 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद, ८५ बंधारे पाण्याखाली

Abhijeet Shinde

कोल्हापूर : रुग्णसंख्या वाढल्यास सीपीआरला मनुष्यबळाची कमतरता

Abhijeet Shinde

पश्चिम महाराष्ट्रातील 12.46 लाख कृषी वीजग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी

Abhijeet Shinde

इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये गगनबावडा तालुक्यातील चार गावांचा समावेश

Abhijeet Shinde

जेष्ठ खगोलशास्त्र शास्त्रज्ञ प्रा. डॉ. आर. व्ही. भोसले यांचे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!