तरुण भारत

पुणे विभागातील 5 लाख 25 हजार 749 रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 5 लाख 25  हजार  749 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 52 हजार 747  झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या  11  हजार  584 इतकी आहे.  कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 414 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे.  पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.12 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

Advertisements

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 54  हजार 624 रुग्णांपैकी 3 लाख 37 हजार 184  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 8  हजार 865  आहे.  कोरोनाबाधित एकूण 8 हजार 575  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण  95.08 टक्के आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 31 लाख 30 हजार  493 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5 लाख  52  हजार 747 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयाचे आनंद महिंद्रा यांच्याकडून कौतुक

Abhijeet Shinde

पंतप्रधान मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण अधिक आवडतो: खासदार मुंडे

Abhijeet Shinde

“पूर्वी संसदेत अभ्यासपूर्ण चर्चा व्हायच्या, सध्याची परिस्थिती वाईट” – सरन्यायाधीश

Abhijeet Shinde

पुणे विभागातील 5 लाख 4 हजार 316 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

राज्यात मंगळवारी ३२ हजार ७०० ग्राहकांना मिळाली घरपोच मद्यसेवा

Abhijeet Shinde

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन

datta jadhav
error: Content is protected !!