तरुण भारत

बोरपाडळे येथील चोरी पाच दिवसात उघड

नोकरीच्या काळातील पगार न दिल्याचा रागातून सुरक्षा रक्षकाची चोरीची कबुली

वारणानगर / प्रतिनिधी

कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावरील बोरपाडळे ता. पन्हाळा येथील प्रो. इंडो अक्वा फिशफीड कंपनीत चोरी प्रकरणी कंपनीतील सुरक्षा रक्षक म्हणुन नोकरीस असलेला सुशांत रघुनाथ चौगले याच्याकडून सुमारे ३ लाख ४३ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी पाच दिवसात गुन्हा उघड करण्यास यश आले. तर नोकरीच्या काळातील पगार न दिल्याचा रागातून चोरी केल्याची सुरक्षा रक्षक सुशांत याने कबुली दिली आहे.

Advertisements

बोरपाडळे हॉटेलनजीकच्या प्रो . इंडो अक्वा फिशफीड कंपनीमध्ये शुक्रवारी सकाळी सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल चोरला. यामध्ये सुमारे अडीच लाखांच्या संगणकीय साहित्यामध्ये ८ मॉनिटर , ८ युपीस , ८ स्टॅबिलायझर , ३ हजारांच्या प्रिंटरसह १ लाखाची फिशऑईल क्विटबॉटल असा सुमारे ३ लाख ४३ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद चंद्रकांत बळीराम पाटील यांनी दिली होती. त्या फिर्यादी नुसार पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक अनिल कदम यानी दिलेल्या मार्गदर्शन व सुचनेवरून स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांनी विषेश मोहीम राबवून संशयित म्हणून बोरपाडळे गावातील कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणुन नोकरीस असलेला सुशांत यास ताब्यात घेतले.

त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने नोकरीच्या काळातील पगार न दिल्याचा रागातून चोरी केल्याची कबुली दिली सदर गुन्हयातील चोरलेला माल कंपनीच्या बाजुला असले जाळ्यांच्या झुडपात लपवून ठेवला असल्याचे सांगितले त्या प्रमाणे तेथील सर्व मुद्देमालाचे साहित्य कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतले.

कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील पोलीस हावलदार भैरू माने,पोलीस नाईक हिंदुराण केसरे,विजय कारंटे,वसंत पिंगळे,प्रदिप यादव,दत्तात्रय हारुगडे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णात पाटील,प्रविण काळे, रवी कांबळे,आत्माराम शिंदे, अंकुशा भोलार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

कबनूर: प्रलंबित मागण्या बाबत कामगारांचा संप सुरूच

Abhijeet Shinde

कागल तहसिलदारांनी करनूर पूरग्रस्तांच्या जाणुन घेतल्या अडचणी

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना तपासणीला गर्दी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : संचारबंदी असतानाही नागरिक बेफिकीर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कळं‌‌‌‌‌बे येथील अपघातात चार ठार

Abhijeet Shinde

गांधीनगरमध्ये विनामास्क, विनाकारण फिराणाऱ्यांवर धडक कारवाई

Abhijeet Shinde
error: Content is protected !!