तरुण भारत

अखेर ‘त्या’ नरभक्षक बिबट्यास ठार करण्यात वनविभागाला यश

प्रतिनिधी / करमाळा, सोलापूर

करमाळा तालुक्यातील तिघांची शिकार करणारा व तालुक्यास हैरान करून शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या बिबट्याला ठार करण्यात वनविभागाला आज यश आले आहे. आज (ता.१८) सायंकाळी या बिबट्याला वांगी नं.४ (ता.करमाळा) येथील रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत गोळ्या घालून ठार करण्यात आले. 

Advertisements

करमाळयातील लिंबेवाडीत 3 डिसेंबर रोजी बिबट्याने हल्ला करून कल्याण फुंदे या तरुणास ठार केले होते. त्यानंतर एक महिला आणि एका मुलीलाही बिबट्याने ठार केले होते.

या बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या दहा – बारा दिवसांपासून वनविभाग व करमाळा पोलीस यंत्रणेनेची शोध मोहिम सुरू होती. परंतु हा बिबट्या कोणाच्या हाती लागला नव्हता तसेच दोन दिवसांपासून गायब झालेला व कोणाच्याही दृष्टिक्षेपास न आलेला नरभक्षक बिबट्या आज अखेर वांगी ४ परिसरात दिसल्याने याभागातील नागरिकांमध्ये मोठी घबराहट निर्माण झाली होती. परंतु वनविभाग व पोलीस यंत्रणेने या बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालून ठार केले आहे. त्यामुळे  करमाळा तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

Related Stories

सोलापूर : पिकअप-दुचाकीची समोरासमोर धडक; दोघे जागीच ठार

Abhijeet Shinde

देशाच्या उभारणीसाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण : राज्यपाल

prashant_c

सोलापूर जिल्ह्यात ३२५ जणांनी कोरोनाला हरविले

Abhijeet Shinde

सोलापूर : कारवाईच्या आश्वासनानंतर पूर्वावर अंत्यसंस्कार

Abhijeet Shinde

सोलापूर : ‘ त्या ‘ नगर सचिवानां परत घ्या, अन्यथा आंदोलन

Abhijeet Shinde

सोलापूर : दुधनीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!