तरुण भारत

महाराष्ट्रात 3,994 नवे कोरोनाबाधित; 75 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 3,994 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 75 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 18 लाख 88 हजार 767 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 48 हजार 574 एवढा आहे.

Advertisements

 
कालच्या एका दिवसात 4,467 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 17 लाख 78 हजार 722 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 60 हजार 352 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 94.17 % आहे. मृत्यू दर 2.57 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 19 लाख 96 हजार 624 नमुन्यांपैकी 18 लाख 88 हजार 767 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 5 लाख 03 हजार 886 क्वारंटाईनमध्ये असून, 4 हजार 168 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

नवे शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपासून

datta jadhav

महाराष्ट्र : 2,936 नवे कोरोनाबाधित; 50 मृत्यू

pradnya p

सातारकरांच्या मनात कोरोनाची धास्तीच नाही

Patil_p

देशात महाराष्ट्र पोलीस दलाचे काम उत्कृष्ट

Patil_p

होमकॉरंटाईनचा शिक्का मारून न घेणाऱ्यावर गुन्हा दाखल

triratna

सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 37.70 मि.मी. पाऊस

Shankar_P
error: Content is protected !!