तरुण भारत

हिंडलग्यात रामचंद्र मन्नोळकरांना भरघोस पाठिंबा

वार्ताहर/ हिंडलगा

हिंडलगा ग्राम पंचायतीसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 2 मधून सलग चौथ्यांदा रिंगणात असलेले ग्रामविकास लोकशाही आघाडीचे अधिकृत उमेदवार व ग्राम पंचायत माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर यांचा हिंडलग्यात झंझावाती प्रचार सुरू असून मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी रामचंद मन्नोळकर, अजय मास्ते आणि ग्राम विकास लोकशाही आघाडीतील विविध वॉर्डातील उमेदवारांच्या प्रचारार्थ हिंडलगा, कलमेश्वरनगर, गोकुळनगर, विजयनगर, समर्थ कॉलनी, श्रीनाथनगर, ओमकारनगर, गणेशपूर आदी भागात भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. याच दरम्यान उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन भेट घेत निवडणुकीत ग्राम विकास लोकशाही आघाडीच्या उमेदवारांनाच भरघोस मते देऊन निवडून आणण्याची विनंती केली. याप्रसंगी मतदारांनी देखील गावच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी रामचंद्र मन्नोळकर व पॅनेलमधील सर्व उमेदवारांना पाठिंबा दर्शवत प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.

Advertisements

यावेळी मतदारांशी बोलताना रामचंद्र मन्नोळकर म्हणाले, हिंडलगा गावचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. पद असो वा नसो पण गावातील रस्ते, गटारी बांधकाम, पाणी समस्या, कचरा आदी समस्यांचे निवारण करून त्या मार्गी लावल्या आहेत. यापुढे देखील शिल्लक राहिलेली विकासकामे पूर्ण करून ‘स्मार्ट’ सीटीच्या धर्तीवर हिंडलगा गावचा विकास करून संपूर्ण गावचा कायापालट करण्याचा मानस आहे.

त्यामुळे पुढील काळात पंचायतीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी ग्राम विकास लोकशाही आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून निवडून आणण्याची विनंती केली.

Related Stories

लॉकडाऊनकाळात मधुमेह रुग्णांनी दक्षता घेणे गरजेचे

Patil_p

जिल्हय़ात स्वॅब तपासणीचा आकडा 4 लाखांच्या घरात

Patil_p

आधी खाणे-पिणे मग ट्रक पळविणे

Amit Kulkarni

शेतकऱयांच्या शिवारात अन् डोळय़ातही पाणी…

Amit Kulkarni

शिवरायांची युद्धनीती, राजनीती व्यवसायात वापरा

Patil_p

बागलकोट जिल्हय़ात आणखी 26 जणांना कोरोना बाधा

Patil_p
error: Content is protected !!