तरुण भारत

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

चिपळूण

मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे घाटात डंपरच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह घटनास्थळावरून न हलवण्याचा निर्णय घेतला.

ओमकुमार सुदाम सिंग (मुळ-बिहार, सध्या-कामथे) असे गुन्हा दाखल झालेल्या डंपर चालकाचे, तर स्वप्नील भागोजी बुदर (31, कामथे-हरेकरवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. अजित बाळा हरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वप्नील  महावितरण कार्यालयात नोकरीसाठी शुक्रवारी सकाळी घरातून सावर्डेकडे निघाला होता. कामथे घाटात डंपरला ओव्हरटेक करत असतानाच अचानक डंपर चालकाने उजवे वळण घेतले. यामुळे स्वप्नील डंपरच्या पुढील बाजूस जोरदार आदळला. यात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला.

              मृतदेह न उचलण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

स्वप्नील हा कामथे-हरेकरवाडी येथे राहत असल्याने अपघाताची माहिती ग्रामस्थांना समजताच ते तातडीने घटनास्थळी जमा झाले. काही चूक नसताना स्वप्नीलचा मृत्यू झाल्याने त्याची डंपरमालकाकडून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली. न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह जागचा न हलवण्याचा निर्णय घेतला. अखेर पोलीस व काही ग्रामस्थांनी हस्तक्षेप केला.

शुक्रवारीच झाला विवाहास एक महिना !

स्वप्नील याचा 18 नोव्हेंबर रोजी विवाह झाला आहे. या विवाहाला शुक्रवारी एक महिना पूर्ण झाला असतानाच अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबासह कामथे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 7 वर्षापूर्वी स्वप्नीलचे वडील भागोजी यांचे ते पंढरपूरला गेले असताना निधन झाले होते. त्यापाठोपाठ स्वप्नीलचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, विवाहित बहीण असा परिवार आहे.

Related Stories

रत्नागिरी जिल्ह्यात चौदा पॉझिटिव्ह रुग्ण

triratna

दापोली बसस्थानकातील दुकानाला आग

triratna

कलिंगडवाला शिवसैनिक दिसला अन् ठाकरेंचा ताफा थांबला!

Patil_p

मंडणगडातून झारखंडचे 128मजूर रेल्वेने मार्गस्थ

Patil_p

फुरूसच्या भुलेश्वर मंदिर परिसराचे रूपडे पालटणार

Shankar_P

माकडतापाचे संकट यंदा गहिरे

NIKHIL_N
error: Content is protected !!