तरुण भारत

ट्रॅक्टरखाली सापडून ऊसतोड मजुराचा मुलगा ठार

प्रतिनिधी / मिरज

मिरज तालुक्यातील मालगावं येथे ट्रॅक्टरखाली सापडून महादेव राहुल पवार (वय 10) हा ऊसतोड मजुराचा मुलगा जागीच ठार झाला. याबाबत राहुल चंद्रकांत पवार यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून, ट्रॅक्टर चालक दशरथ बिभीषण शिंदे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

राहुल पवार हे मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत. ते ऊसतोडीसाठी मालगाव येथे आपल्या कुटुंबियांसह राहण्यास आले आहेत. दशरथ हा ऊस वाहतुकीसाठी आणलेल्या ट्रॅक्टरमसधून ऊसतोड मजुरांच्या मूलांना घेऊन जात होता. गुंडेवाडी-पंढरपूर रस्त्यावर दशरथ हा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवत होता. त्यावेळी पाठीमागे बसलेला महादेव हा चालत्या ट्रॅक्टरमधून खाली पडला. त्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने तो ठार झाला. ऊसतोड मजुराच्या चिमुरड्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisements

Related Stories

शिवाजी विद्यापीठ देणार प्रवेश शुल्कात 20 टक्के सवलत

Abhijeet Shinde

गांधीनगरमधून तामिळनाडूच्या व्यापाऱ्याचे पाच लाख लंपास

Abhijeet Shinde

पुणे-बेंगळूर महामार्गावर शिरोलीपासून सातारला जाणारी एकेरी वाहतूक सुरु

Abhijeet Shinde

प्रकाश बापू पाटील यांना अभिवादन

Abhijeet Shinde

सांगली : कृष्णेत दिड लाख क्युसेस विसर्ग

Rohan_P

इस्लामपुरात मंडल अधिकाऱ्याने तलाठ्यास लगावले ठोसे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!