तरुण भारत

विरोधी पक्षनेते अक्कलकोटेंसह नऊ जण निर्दोष

प्रतिनिधी / बार्शी

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यातून 9 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. चिखर्डे येथील घटनेत बार्शीतील जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिला असून बानपा विरोधी पक्षनेते अॅड.नागेश अक्कलकोटे यांच्यासह 9 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

तालुक्यातील चिखर्डे येथे 2009 च्या विधानसभा निवडणुकांवेळी झालेल्या एट्रोसिटी आणि हल्ल्याच्या गुन्ह्याचा निकाल जिल्हा सत्र न्यायालयाने जाहीर केला. याप्रकरणी आरोप सिद्ध न झाल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 22 ऑक्टोबर 2009 रोजी चिखर्डे येथील हनुमंत विलास अपुणे त्यांच्या समाधान तुपेरे, अमित कोंढारे, समीर शेख, विजय कोंढारे या मित्रांसोबत तुकाई मंदिराजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी, पिंटू उर्फ संजीव सातपुते, सतिश सातपुते, नागेश अक्कलकोटे हे सुमो गाडीतून तेथे आले. तेव्हा, गावातील भगवंत पाटील, जवाहरमल पाटील, बापू पाटील श्रीराम उर्फ समाधान कोंढारे, प्रकाश कोंढारे, विनायक कोंढारे हेही तेथे गोळा झाले.

Advertisements

यावेळी, भगवंत पाटील यांनी समाधान तुपेरे यांस जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तलवारीने मारले, विनायक कोंढारे यांनी गजाने मारले, अक्कलकोटे यांनी ब्लेडने मारले व इतरांनी काठीने मारहाण केली. गावकऱ्यांनी सोडवा सोडवी केल्यानंतर ते निघून गेले, अशी फिर्याद पांगरी पोलिसात दिली होती. त्यानुसार, वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक मौला चौधरी यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. दरम्यान, जातीवाचक शिवीगाळ झाल्याचं म्हटलेल्या व्यक्तीची साक्षच घेतली गेली नाही. तसेच आरोप सिद्ध झाले नसल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

Related Stories

काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्षपदी आमदार प्रणिती शिंदे

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीण भागात 17 कोरोनाबाधित रुग्णांची भर

Abhijeet Shinde

रेल्वेने दोन कोटी रुपये प्रवाशांचे केले परत

Abhijeet Shinde

सोलापूर : मटकाकिंग नगरसेवक सुनील कामाटी जेरबंद

Abhijeet Shinde

सोलापुरात गुरूवारी नव्याने 81 कोरोनाबाधित रुग्णांची भर

Abhijeet Shinde

सोलापूर : माढा तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.२५ टक्के

Abhijeet Shinde
error: Content is protected !!