तरुण भारत

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बार्शीच्यावतीने ग्राहक प्रबोधन पंधरवडाचे आयोजन

प्रतिनिधी / बार्शी

दरवर्षी २४ डिसेंबर हा राष्टीय ग्राहक दिन म्हणुन शासकीय व जनसमान्यामध्ये संपुर्ण भारतात साजरा केला जातो. त्याच एक भाग म्हणुन या वर्षी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बार्शीच्यावतीने लोकजागृती व्हावी तसेच ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ ची व्यापक प्रसिध्दी मिळावी म्हणुन ग्राहक प्रबोधन पंधरवाडाचे आयोजन केले आहे. त्याची सुरुवात आज मा. बार्शी शहराचे प्रथम नागरीक मा. अॅड. असीफ तांबोळी यांचे हस्ते बार्शी नगर परिषद येथील जगदाळे मामा समिती सभागृहामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बार्शी तालुका अध्यक्ष अॅड विजय नरसिंह कुलकर्णी यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ चे महत्व व संघटना मध्ये सहभागी होणे बाबत विचार व्यक्त केले तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बार्शी तालुका श्री अमर नाकटिळक यांनी ग्रहक पंचयतीचे ऑनलाईन सदस्य नोंदणी बाबत माहिती दिली. ते म्हणाले की सदस्य होणे साठी

hptts://www.abgpindia.com/join-us/registration वर आपली नोंदणी करावी असे अहवान केले.

Advertisements

या प्रसंगी मा. नगराध्यक्ष अॅड. असिफ तांबोळी, बार्शी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती अमिता दगडे पाटील, माजी नगरसेवक अशोक बोकेफोडे पाणीपुरवठा अभियंता अजय होनखांबे तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बार्शी तालुका कार्यकारणी सदस्य महेश निकम, किरण मक्के, जयंत देशमुख, अॅड. नविन सरवदे, बाळासाहेब पाटील, अमर नाकटिळक, अॅड. विजय कुलकर्णी उपस्थित होते.

Related Stories

तरुण भारत इम्पॅक्ट : सुलाखे हायस्कूलमधील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार बंदचे आदेश

Abhijeet Shinde

सोलापूर : ..म्हणून आदिनाथ कारखान्याच्या दोघा संचालकांनी दिला राजीनामा

Abhijeet Shinde

शहरात ३८ तर ग्रामीणमध्ये ३० नवे रुग्ण

Abhijeet Shinde

संशोधनात गुंतवणूक न झाल्यास भविष्यात साखरेचा तुटवडा

Patil_p

मिस इंडिया अंतिम स्पर्धेसाठी सोलापूरच्या ईशा वैद्यची निवड

Abhijeet Shinde

सोलापूर : पेटीत पैसे ठेवले की दुप्पट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!