तरुण भारत

IndVsAus: टीम इंडियाला मोठा धक्का; मोहम्मद शमी मालिकेबाहेर

ऑनलाईन टीम

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्याच कसोटीत भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशातच भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या हाताला दुखापत झाली असून त्याला उर्वरित मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता शमी पुढील तीन कसोटीत दिसणार नाही.

अॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शमी फलंदाजी करत होता. यावेळी पॅट कमिन्सचा एक उसळता चेंडू जोरात शमीच्या उजव्या हाताच्या मनगटावर आदळला. मार जोरात लागल्याने शमीला हात उचलणंही अवघड झाले होते. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीनेही शमीला खूप वेदना होत असल्याचे सांगितले. तसेच त्याला तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचेही विराटने सांगितले.

Related Stories

विद्यमान विजेत्या विंडीजचा 55 धावात धुव्वा!

Patil_p

ज्युवेंट्सच्या प्रशिक्षकाची हकालपट्टी

Patil_p

जेफ थॉमसनच्या तालमीत घडला प्रसिद्ध कृष्णा!

Patil_p

युगांडाच्या बेपत्ता वेटलिफ्टरचा शोध

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज

Patil_p

एटीपी मानांकनात सित्सिपस चौथ्या स्थानी

Patil_p
error: Content is protected !!