तरुण भारत

प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीला 16 लाखांचा नफा

कोरोना काळातही प्रियदर्शनीची गरूड झेप

प्रतिनिधी/ येळ्ळूर

Advertisements

प्रियदर्शिनी नवहिंद महिला पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रियदर्शिनी भवन सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडली. 24 व्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरपर्सन वैशाली मजुकर होत्या. यावषी सोसायटीला 16 लाख 46 हजार रुपयांचा नफा झाला असून सभासदांना 12 टक्के लाभांश देण्याचे सभेमध्ये जाहीर करण्यात आले. कोरोना काळातही सोसायटीने घेतलेल्या या गरूड झेपेबद्दल कौतुक होत आहे.

सध्या सोसायटीकडे 57 कोटीचे खेळते भांडवल आहे. 10 कोटी 50 लाख गुंतवणूक आहे. 53 कोटी 78 लाखांच्या ठेवी आहेत. सोसायटीने 43 कोटी 7 लाख रुपयांची कर्जे दिली आहेत. सोसायटीने ही केलेली प्रगती उल्लेखनिय असून आर्थिक संकटाला दूर करत एकजुटीने काम केल्याने हे यश प्राप्त झाल्याचे वैशाली मजुकर यांनी सांगितले.

प्रारंभी महिला कर्मचाऱयांनी स्वागतगीत म्हटले. वंदना सायनेकर यांनी वृत्तांताचे वाचन केले. प्रशांत कंग्राळकर यांनी ताळेबंद पत्रकाचे वाचन केले. अनिल पाटील यांनी नफा, तोटा पत्रकाचे वाचन केले. नफा विभागणीचे वाचन शामल जाधव यांनी केले. अंदाज पत्रकाचे वाचन सीमा घाडी यांनी केले. नवहिंद पतसंस्थेचे संचालक प्रकाश अष्टेकर यांनी विचार व्यक्त केले. सोसायटीच्या सचिव कांचन पाटील यांनी प्रगतीचा आढावा घेतला.

सरिता जाधव यांनी सुत्रसंचालन केले. व्हा. चेअरपर्सन नम्रता पाटील यांनी आभार मानले. यावेळी नवहिंद सोसायटीचे चेअरमन उदय जाधव, नवहिंद मल्टिपर्पजचे चेअरमन वाय. सी. गोरल, नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, नवहिंद महिला प्रबोधन संघाच्या अध्यक्षा शुभांगी पाटील, सी. बी. पाटील, प्रदीप मुरकुटे, दशरथ पाटील, संभाजी कणबरकर, एल. आय. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नवहिंद क्रीडा केंद्राचे कार्यकर्ते, कार्यकर्त्या, सभासद व संस्थेचा कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

Related Stories

पाच महापुरुषांचे पुतळे उभारणार

Patil_p

हंदिगनूर, बोडकेनहट्टी, कुरिहाळ गावात कडक निर्बंध

Amit Kulkarni

समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्तीत गैरप्रकार

Amit Kulkarni

गरज सिटी बससेवा सुधारण्याची

Patil_p

कोरोनाकाळात घरोघरी जाऊन शेतीचा फाळा केला वसूल!

Amit Kulkarni

परिवहनच्या निवृत्त कर्मचाऱयांचे वाढीव पेन्शनसाठी आंदोलन

Amit Kulkarni
error: Content is protected !!