तरुण भारत

राशीभविष्य

रविवार दि.20 ते शनिवार दि.26 डिसेंबर 2020

मेष

Advertisements

या सप्ताहात तुमच्याच राशीत मंगळ प्रवेश, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात चांगली वाढ होईल. जुने येणे वसूल करा. प्रवासात घाई करू नका. तुमचा आत्मविश्वास वाढेल. उत्साहावर ताबा ठेवा. घरातील काही व्यक्ती मनस्ताप देतील. राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण मिळेल. सहकारी एखादी चूक करतील. स्वत:च्या आहाराची काळजी घ्या. नोकरीत प्रभाव पडेल. कला, साहित्य, शिक्षणात प्रगती होईल.

वृषभ

या सप्ताहात मेष राशीत मंगळ प्रवेश, गुरु, शनि युती होत आहे. धंद्यात एखादे धोरण तुम्हाला आवडणार नाही. व्यवहारात सावध रहा. करारावर सही करताना मोहाला बळी पडू नका. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. प्रवासात सावध रहा. राग वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर टीका होईल. वरि÷ांचा रोष होईल. कायद्याला धरून बोला. शिक्षणात आळस नको. संसारात जबाबदारी वाढेल.

मिथुन

या सप्ताहात मेष राशीत मंगळ प्रवेश, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात समाधान ठेवा. जास्त मोह मनस्ताप देणारा ठरू शकतो. कायदा मोडू नका. नवीन ओळख पारखून घ्या. नोकरीतील किचकट कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात विरुद्धलिंगी व्यक्तीकडून मनस्ताप होईल. सावध रहा. वरि÷ांच्या सहमतीने काम करता येईल. संसारात जवळच्या व्यक्तीची चिंता वाटेल. अनाठायी खर्च होऊ शकतो.

कर्क

या सप्ताहात मेषेत मंगळ प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यातील चर्चा करताना तारतम्य ठेवा. वादाकडे चर्चा जाईल. क्षुल्लक कारणावरून हातचे काम निसटू शकते. गोड बोला. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठांच्या बरोबर मतभेद होतील. प्रसंग सावरून घेता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला सर्वांची बाजू मांडावी लागेल. अनादर सहन करावा लागेल. बोलतांना चूक करू नका.

सिंह

या सप्ताहात मेषेत मंगळ प्रवेश, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात चर्चा यशस्वी होईल. मोठे काम घेऊन ठेवा. नोकरीतील चूक सुधारता येईल. मैत्रीत गैरसमज होईल. खाण्याची काळजी घ्या. संसारातील व्यक्तींना समजूत घ्यावे लागेल. मनावर दडपण येईल. राजकीय, सामाजिक कार्यातील कठीण कामे योग्य सल्ल्याने पूर्ण करा. रेंगाळत ठेवू नका. जवळच्या नेत्यांना, सहकारी वर्गाला कमी लेखू नका.

कन्या

या सप्ताहात मेषेत मंगळ प्रवेश, गुरु, शनि युती होत आहे. रागाचा पारा वाढवणारी घटना घडू शकतो. सावध रहा. वाहन जपून चालवा. आध्यात्मिक क्षेत्रात मन रमेल. धंद्यात थोडे समाधान मानावे लागेल.  नवे काम घ्या. नोकरीत वरि÷ांच्या मताचा आदर करा. नम्रपणे मत व्यक्त करा. राजकीय, सामाजिक कार्यात गरज पडेल, तेव्हाच बोला. तटस्थपणे इतरांचे निरीक्षण करा. घरातील कामे होतील. शिक्षणात प्रगती होईल.

तुला

या सप्ताहात मेषेत मंगळ प्रवेश, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात वाढ करता येईल. प्रवासात घरातील कामे करताना घाई करू नका. दुखापत होईल. रागावर ताबा ठेवा. मागील येणे वसूल करा. नोकरीत महत्त्वाची कामे करून घ्या. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात अधिकार मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कला, साहित्य, शिक्षणात प्रगती कराल.

वृश्चिक

या सप्ताहात मेषेत मंगळ प्रवेश, सूर्य,बुध युती होत आहे. विरोधकांना योग्य प्रकारे शह देता येईल. धंद्यात जम बसेल. वसुली करा. परिचयात वाढ होईल. किचकट कामे करून घ्या. नोकरीत वर्चस्व वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रतिष्ठां वाढेल. आर्थिक सहाय्य जमा करता येईल. लोकसंग्रह वाढेल. कला, साहित्य, शिक्षणात  नवा मार्ग मिळेल. संधीचा फायदा ठेवा. संसारात सौख्य मिळेल. विवाह, संतती संबंधी प्रगती येईल.

धनु

या सप्ताहात मेषेत मंगळ प्रवेश, गुरु, शनि युती होत आहे. धंद्यातील समस्या कमी करता येईल. थोडी तडजोड करावी लागेल. खर्च करावा लागेल. संतती बरोबर तणाव होईल. नोकरीत महत्त्वाचे काम करून दाखवाल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. योजनांना गती द्या. मोह आवरा, व्यसन नको. कला, साहित्य, शिक्षणात प्रेरणा देणारी घटना घडेल. आळस नको.

मकर

या सप्ताहात मेषेत मंगळ प्रवेश, गुरु, शनि युती होत आहे. धंद्यात तणाव होऊ शकतो. करार करताना फसगत होऊ शकते. सावध रहा. धोका टाळता येईल. वसुली करा. नोकरीत काम वाढेल. बोलण्यातून गैरसमज होईल. खालच्या सुरात चर्चा करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या  बळाचा गैरवापर कुणी करत आहे का, याकडे लक्ष ठेवा. कलेत मन रमेल. शिक्षणात मेहनत घ्या. यश मिळेल. मोठेपणा नको.

कुंभ

या सप्ताहात मेषेत मंगळ प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. मागील येणे वसूल करा. नवे काम घेऊन ठेवा. नोकरीत प्रभाव पडेल. मुलांच्या प्रगतीमुळे तुम्ही खूष रहाल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर इतरांचे यश अवलंबून असेल. सहयोग योग्य प्रकारे देता येईल. योजना पूर्ण करा. अधिकार वाढेल. मैत्री वाढेल. पला, साहित्य, शिक्षणात पुढे जाल.

मीन

या सप्ताहात मेषेत मंगळ प्रवेश, गुरु, शनि युती होत आहे. धंद्यात मोठे काम मिळवा. परिचयात वाढ होईल. जुनी वसुली करा. सप्ताहाच्या सुरुवातीला क्षुल्लक समस्या येईल. खंबीरपणे मार्ग शोधता येईल. प्रवासात घाई नका. नोकरीत प्रभाव पडेल. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांची पूर्ती करता येईल. लोकसंग्रह वाढेल. किचकट कामे होतील. कला, साहित्य शिक्षणात प्रगती होईल. वेळेला महत्त्व द्या.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 16 जानेवारी 2021

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 2 जुलै 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 10 मे 2021

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 14 डिसेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य बुधवार दि. 2 सप्टेंबर 2020

Patil_p

तुमचे ग्रह आमचा अंदाज

Patil_p
error: Content is protected !!