तरुण भारत

हेल्मेट न वापरणारांवर कारवाईचा बडगा

कराडात वाहतूक पोलिसांची महामार्गावर कारवाई

प्रतिनिधी/ कराड

Advertisements

महामार्गावर हेल्मेट न वापरणाऱया दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी शनिवारी कारवाईचा बडगा उगारला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजनी पाटील यांच्या पथकाने हेल्मेट नसणाऱया दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करून समज दिली. यापुढे महामार्गावर हेल्मेट न वापरणारांवर कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला. 

कराडच्या वाहतूक शाखेचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सरोजनी पाटील ऍक्शन मोडवर आहेत. त्यांनी पहिल्यांदा अवैध रिक्षा थांबे हटवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर नाक्यावरील खासगी आरामबसवर कारवाईचा बडगा उगारत त्यांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने समज दिली. शनिवारी त्यांच्या पथकाने कराड, मलकापूर हद्दीतील महामार्गावर दुचाकीस्वारांकडे कागदपत्रांची तपासणी केली. ज्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नाही, अशा दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला. प्रत्येक दुचाकीस्वारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मलकापूर फाटा, कोल्हापूर नाका, हॉटेल पंकज परिसरात कारवाई करण्यात आली. महामार्गावर दुचाकीस्वारांनी यापुढे हेल्मेटचा वापर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजनी पाटील म्हणाल्या, महामार्गावर दुचाकीस्वारांनी स्वतःची सुरक्षितता म्हणून हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. दुर्दैवाने अपघात झाल्यास हेल्मेटमुळे जीव वाचू शकतो. हेल्मेट न वापरणारांवर यापुढे कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी महामार्गावरून प्रवास करताना हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

Related Stories

जिल्हय़ात कडक लॉकडाऊनला आरंभ

Patil_p

संचारबंदी असताना खेराडे वांगीचा मृतदेह तालुक्यात आलाच कसा : संग्रामसिंह देशमुख

Abhijeet Shinde

खुशखबर : ‘महालक्ष्मी’तून प्रवासासाठी सांगलीकरांना अतिरिक्त आरक्षण कोटा

Abhijeet Shinde

प्रतिपंढरपूर करहरमधील आषाढी एकादशी उत्सव रद्द

datta jadhav

सांगली : बहेत मंडळांचा सार्वजनिक गणपती न बसवण्याचा निर्णय, खर्चाचे पैसे ‘या’कार्यासाठी वापरणार

Abhijeet Shinde

मालकाला खूश करण्यासाठी भास्कर जाधवांची महिलेला अरेरावी – आशिष शेलार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!