तरुण भारत

सलग दुसऱ्या दिवशी ही तासगाव तालुक्यात भाजपला धक्का

वार्ताहर / हातनूर

तासगावच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या उपस्थितीत हातनूरमधील खासदार संजयकाका पाटीलयांच्या एका गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. यामुळे तासगाव तालुक्यात खासदार गटाला मोठी गळती लागली म्हटले तर वावगे ठरणार नाही.

हातनूरमधील शेतकरी नेते स्व. हरीभाऊ खुजट यांचे चिरंजीव प्रकाश हरीभाऊ खुजट यांच्यासह बाळासो पाटील शेट किसन पाटील काशिनाथ पाटील मधुकर पाटील गणेश पाटील उत्तम पाटीलसह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार सुमनताई पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात घेतले, व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला, यामुळे हातनूरच्या राजकारणात उलता पालत होण्याची चिन्हे दिसत आहेत. खासदार संजयकाका पाटील गटाला सलग दुसऱ्या दिवशी मोठे धके बसले आहेत. तालुक्यातील अनेक गावातून पक्ष प्रवेशासाठी च्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

हातनूरमध्ये स्व. आर आर पाटील यांच्या मृत्यूनंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील व मोहन आण्णा पाटील यांच्यासह संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य यांनी भाजपचे कमळ हातात घेऊन खासदार संजयकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमय झाले होते, येथे तीन गट एकत्र काम करत होते, परंतु आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोटा धक्का बसला आहे.

आज पक्ष प्रवेशा वेळी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विश्वास तात्या पाटील तासगाव शहर अध्यक्ष गजानन खुजट ताजुद्दीन तांबोळी आर आर पाटील सर उत्तम आण्णा पाटील दिलीप पाटील आनंदराव पाटील गणेश पाटील रणदीप पाटील सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या सोडवणार : खा. संजयकाका पाटील

Sumit Tambekar

सांगली : आमणापूर येथे विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात नवे ११५० रूग्ण, ३३ मृत्यू

Abhijeet Shinde

राजू शेट्टींनी पीक विमा कंपनीची बोगसगिरी आणली उघडकीस

Abhijeet Shinde

सांगली :शिक्षणातून पारधी समाजाचा पांग फेडला, दहावीच्या 2 मुलांचा केला गौरव

Abhijeet Shinde

पदवीच्या तिसऱ्या वर्षातील अभ्यासक्रमांची परीक्षा लांबणीवर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!