तरुण भारत

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

वार्ताहर / यड्राव

गणेश नगर इचलकरंजी येथे दिनांक 17 रोजी झालेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या​ पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.​ त्या मयत पादचाऱ्याचा पूर्ण नाव व पत्ता​ मात्र समजू शकला नाही. याबाबतची फिर्याद इमरान अब्दुल रहमान शेख वर्षी 28 रा.​ षटकोन चौक इचलकरंजी यांनी​ शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

दिनांक 17 रोजी दुपारी चारच्या सुमारास गणेश नगर गल्ली नंबर 2 परिसरात फिर्यादी इमरान शेख हे मित्राच्या वाढदिवसानिमित्त गेले असता तेथे अचानक मोठा आवाज झाल्याने त्या आवाजाच्या​ ​ दिशेने गेले असता एका अज्ञात मोटरसायकल​ स्वराने भरधाव वेगाने येऊन एका​ पादचार्याला​ जोराची धडक दिली.

Advertisements

यात​ पादचाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली परंतु तो मोटरसायकलस्वार तेथे​ न थांबता भरधाव वेगाने निघून गेला. त्या जखमी इसमास उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. परंतु दिनांक अठरा रोजी दुपारी एकच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला यातील मयत व्यक्तीचे वय अंदाजे 50 ते 55 असून अंगाने जाड, रंग-गोरा, पांढरी दाढी, थोडे टक्कल, नाक निमुळते व अंगात शेवाळी रंगाचा हाफ शर्ट​ असे त्याचे वर्णनअसून याबाबतची अधिक माहिती असल्यास शहापूर पोलिस संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाखाची मदत

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक आघाड्यांनाच कौल

Abhijeet Shinde

शिक्षक मतदार संघातून अनेक मातब्बर उमेदवारांची माघार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : उत्तर कार्याचा खर्च टाळून केला कोरोना योध्दांचा सत्कार

Abhijeet Shinde

शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान

Abhijeet Shinde

गोकुळचा दूध विक्रीत विक्रम

Abhijeet Shinde
error: Content is protected !!