तरुण भारत

महाराष्ट्रात 3,811 नवे कोरोना रुग्ण ; 98 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 3,811 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 98 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 18 लाख 96 हजार 518 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 48 हजार 746 एवढा आहे. 

Advertisements


कालच्या एका दिवसात 2,064 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 17 लाख 83 हजार 905 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 62 हजार 743 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 94.06 % आहे. मृत्यू दर 2.57 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 21 लाख 19 हजार 196 नमुन्यांपैकी 18 लाख 96 हजार 518 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 5 लाख 02 हजार 362 क्वारंटाईनमध्ये असून, 3 हजार 730 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सदनिका अर्ज नोंदणीचा शुभारंभ

Rohan_P

राज्यात राष्ट्रपती राजवटीचे संकेत ?

Sumit Tambekar

प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने खासदार उदयनराजेंनी घेतली बैठक

Patil_p

35 मोबाईल चोरणारा अल्पवयीन चोरटा जेरबंद

Patil_p

आर्यन खानला मोठा दिलासा, कोर्टाकडून जामीन मंजूर

Abhijeet Shinde

Pegasus Spyware : फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंग यांच्या काळात झाले ; फडणवीसांचा दावा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!