तरुण भारत

अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनची निवडणूक तूर्ताला रद्द

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण बैठक सोमवारी आयोजित केली आहे. दरम्यान या बैठकीवेळी फेडरेशनच्या कार्यकारिणी समितीची निवडणूक होणार नाही. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला व्यवस्थापन घडामोडी स्वतंत्रपणे हाताळताना नियमांचे पालन करण्याचा आदेश फिफाने दिला आहे.

Advertisements

अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या विद्यमान कार्यकारी समितीचा चार वर्षांचा कालावधी सोमवारी संपत आहे. दरम्यान फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी होणाऱया वार्षिक सर्वसाधारण बैठकीवेळी कार्यकारी समितीची निवडणूक घेण्यात येणार होती. पण फिफाच्या आदेशानुसार ही निवडणूक आता घेतली जाणार नाही. 2012 सालापासून प्रफुल्ल पटेल हे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. आता त्यांना क्रीडा नियमावलीनुसार यावेळी निवडणूक लढविता येणार नाही. गेल्या महिन्यात फुटबॉल फेडरेशनतर्फे सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला असून फेडरेशनच्या कार्यकारिणी समितीचा कालावधी संपला असल्याने आगामी निवडणुकीसाठी नव्या घटनेखाली प्रशासकांची नियुक्ती न्यायालयाकडून झाली नसल्याने ही निवडणूक सोमवारी घेतली जाणार नाही.

Related Stories

आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचे पुनरागमन

Patil_p

बोरुसिया डॉर्टमंडचा एकतर्फी विजय

Patil_p

माजी स्पिनर चंद्रशेखर इस्पितळात

Patil_p

लॉकडाऊन कसोटी मालिकेसाठी पथ्यावरच पडेल!

Patil_p

नेमबाजीत तेजस्वीनी सावंतचे वर्चस्व

Patil_p

क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर कोरोनामुक्त

Patil_p
error: Content is protected !!