तरुण भारत

डिचोलीचा प्रसिध्द ‘नवा सोमवार’ उत्सव आज

डिचोली/प्रतिनिधी

  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक प्रमुख उत्सवांना मर्यादित स्वरूप आले असून त्याच धर्तीवर आज सोम. दि. 21 डिसेंबर रोजी डिचोलीतील देवी श्री शांतादुर्गेचा प्रसिद्ध “नवा सोमवार” उत्सव गावकरवाडा डिचोली आणि आतीलपेठ डिचोली येथे साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी डिचोलीत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारतर्फे आखण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वा?नुसार हा उत्सव साजरा करण्याचे दोन्ही गटांतर्फे ठरविण्यात आले आहे. या मर्यादित स्वरूपातील उत्सवातही पालखीच्या स्वागतास डिचोलीवासीय सज्ज झालेले आहेत.

    गावकरवाडा डिचोली येथील देवी श्री शांतादुर्गेच्या मंदिरात ग्रामस्थ गावकर मंडळातर्फे आज दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर रात्री देवीची पालखी बाहेर निघणार. तर आतीलपेठ डिचोली येथील श्री देवी शांतादुर्गेच्या मठमंदिरात भायलीपेठ बाजारकर उत्सव समिती गुरूफंड ट्रस्ट डिचोलीतर्फे यावषीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त मठमंदिरात सकाळी विविध धार्मिक विधी व इतर कार्यक्रम होणार. रात्री पालखी भाविकांच्या भेटीसाठी बाहेर पडणार.

गावकरवाडा येथील उत्सव

डिचोली येथील ग्रामस्थ गावकर मंडळातर्फे श्री शांतादुर्गा  देवीचा नवा सोमवार उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक धार्मिक तसेच गायनाच्या मैफली आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. कोविडच्या मार्गदर्शक तत्वा?चे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान समितिचे राजाराम गावकर, श्यामु गावकर, सुनील परब, अशोक परब, मधू परब, वासुदेव गावकर, रामा गावकर, निशकांत परब, सतीश परब, लक्ष्मण गावकर, मुक्तेश गावकर, वल्लभ परब, श्रीपाद परब, रवळू परब या पदाधिकाऱयांनी केले आहे.

     या उत्सवानिमित्त मंदिरात सकाळपासून धार्मिक विधी. दुपारी आरतीस तिर्थप्रसादस, रात्री साडेनऊ वाजता पालखी मिरवणूकीला प्रारंभ होणार आहे.

गायनाच्या मैफली

  गायनाची पहिली बैठक रात्री 10 वा मंदिर परिसरात  होणार असून त्यात नाटय़, भक्ती, भावरंग या कार्यक्रमात रेवा नातू, श्रीरंग भावे (पुणे) तसेच निवेदिका नेहा उपाध्ये सहभागी होतील. दुसरी बैठक  रात्री 1 वाजता रवळनाथ मंदिर प्रांगणात होणार असून “चांदणे स्वरांचे” हा सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे.  त्यात नितेश सावंत, समीक्षा भोबे काकोडकर हे सहभागी होतील. निवेदन संजय सालेलकर करणार आहे.

  पालखी मिरवणूक पहाटेपर्यंत परिसरातून फिरून नंतर मंदिरात परतेल या उत्सवात भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

आतीलपेठ येथील उत्सव

भायलीपेठ बाजारकर महाजन उत्सव समिटी व गुरुफंड ट्रस्ट डिचोलीतर्फे या वषीचा नवा सोमवार उत्सव साजरा होणार असून हा उत्सव या वषी मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती  देण्यात आली. जागतिक करोना महामारीचा संसर्ग लक्षात घेऊन सर्वांच्या सुरक्षित तेच्या दृष्टीने सरकारी नियम पळून उत्सव होणार आहे.

  सकाळी धार्मिक विधी त्यानंतर आतीलपेठ श्री शांतादुर्गा मंदिरात सकाळी 9 ते रात्री पालखी मंदिरात येईपर्यंत  ओटी फुले नारळ आदी साहित्य मठ मंदिरात सुरक्षित अंतर ठेवून स्वीकारण्यात येईल.

   संध्याकाळी 7 वा श्री देवी शांतदुर्गेची पालखी श्री  महादेव मंदिराकडून निघेल त्यानंतर पालखी मिरवणूक आंतील पेठ, सोनार पेठ, भायली पेठ, बोर्डे वडाकडे दाखल होईल. येथे वडाला वळसा घालून सुं?दरपेठेतून रात्री मठ मंदिरात परत येईल. याची भाविकांनी नोंद घ्यावी.

पालखीतील देवीला केवळ ओवाळणी करावी, ओटी स्विकारली जाणार नाही !

   पालखी  मिरवणूक दरम्यान आपल्या दारात श्री  शांतदुर्गेला फक्त आरती ओवाळणी करता येईल. फुले, फळे, नारळ, ओटी आदी साहित्य स्वीकारले जाणार नाही. याची सर्वानी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पालखी समोर येणाऱया प्रत्येक भक्ताने  मास्कचा वापर करावा व सुरक्षित अंतर ठेवावे असे आवाहन भायलीपेठ बाजाकर महाजन उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

पारंपरिक फेरीवाल्यांची दुकाने थाटली जाणार

  हा उत्सव जरी मर्यादित स्वरूपाचा असला तरी या उत्सवानिमित्त डिचोली शहर परिसरात थाटण्यात येणारी फेरीवाल्यांची दुकाने काही प्रमाणात थाटली जाणार आहेत. डिचोलीच्या मामलेदारांकडून पारंपरिक फेरीवाल्यांना सर्व मार्गदर्शक तत्वे सांभाळून दुकाने थाटण्यची परवानगी दिली असून सामाजिक अंतर राखून आणि प्रत्येकाला मास्काची सक्ती करुनच व्यवसाय करावा अशी कडक सुचना दिली आहे. दुकाने अंतर राखून कशा प्रकारे थाटावी याची जबाबदारी डिचोली नगरपालिकेची असणार. तर गर्दीवर नियंत्रण आणून लोकांकडून कोवीड मार्गदर्शक तत्वे सांभाळली जाणार याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी, अशी सुचना करण्यात आली आहे.

Related Stories

‘संजीवनी’संबंधी कुठलाही निर्णय शेतकऱयांना विश्वासात घेऊनच !

Patil_p

मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसला भीषण अपघात; 22 जखमी

prashant_c

जि. पं.मतदान रोखण्यास खंडपीठाचा नकार

Patil_p

बाणावली येथे तीन होडय़ांना आग

Omkar B

गोमंतकीयांनाही आता ‘टोल’ चा भुर्दंड

Amit Kulkarni

ईस्ट बंगालची लढत हैदराबाद एफसीशी

Amit Kulkarni
error: Content is protected !!