तरुण भारत

सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरात आता खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात – प्रकाश ढंग

कुपवाड / प्रतिनिधी


महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरात आता खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली आहे, याच पद्धतीने कुपवाडच्या सिद्धार्थनगर भागाचाही कायापालट होऊ लागला आहे, असे प्रतिपादन नगरसेवक प्रकाश ढंग यांनी येथे बोलताना केले.

कुपवाडमधील नामदेव थोरात घर ते मल्हारराव होळकर चौकापर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण कामाचे उद्घाटन नगरसेवक प्रकाश ढंग व मिलिंद सरोदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ढंग बोलत होते. स्वागत संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे यांनी केले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेला दिलेल्या शंभर कोटी निधीतून खासदार संजयकाका पाटील, आ.सुरेश खाडे, आ.सुधीर गाडगीळ व शेखर इनामदार यांच्या माध्यमातून कुपवाडमधील विकासकामे जलद गतीने सुरु झाली आहेत. याच निधीतून सिद्धार्थनगरमधील सम्राट अशोक चौक ते थोरात घरापर्यंतच्या रस्ता कामास सुरवात झाली असल्याचे प्रकाश ढंग यांनी सांगितले. बऱ्याच वर्षातुन रस्त्याचे काम मार्गी लागल्याने येथील नागरिकांनी प्रकाश ढंग यांचे कौतुक केले.

Advertisements

Related Stories

सांगली : आयर्विन पूल येथे पाणी पातळी स्थिर, संध्याकाळपर्यंत पूर उतरण्याची शक्यता – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

ज्यादा प्रवासी भरलेल्या आटपाडी-सांगली एसटीवर पोलिसांची कारवाई

Abhijeet Shinde

सांगली : माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

सांगली : अफवांवर विश्वास ठेऊ नका, कोयनेतून ५५ हजार क्युसेस विसर्ग – गुणाले

Abhijeet Shinde

शेती कायद्यात ठाकरे सरकारची दुटप्पी भूमिका : फडणवीस

Abhijeet Shinde

इस्लामपुरची महिला किल्ले मच्छिंद्र गडावर अपघातात ठार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!