तरुण भारत

बेटी बचाव फाऊंडेशनमार्फत स्कूल बॅगचे वाटप

प्रतिनिधी / वाकरे

बेटी बचाव फाऊंडेशन व संस्थापक अध्यक्ष राजू महेंद्र सिंग मुंबई यांच्यावतीने वाशी ता.करवीर येथील कन्या विद्यामंदिर या शाळेतील पहीली ते सातवीपर्यंतच्या सर्व मुलींना स्कूल बॅग वाटप करण्यात आले.

Advertisements

बेटी बचाव फाऊंडेशनच्या निकीता जाधव यांनी मुलींच्या शाळेसाठी वॉशरुम व खेळासाठी लागणारे सर्व साहीत्य लवकरात लवकर देऊ अशी घोषणा केली. मुंबईहून वाशीमध्ये येऊन मुलींना स्कूल बॅग वाटप केल्याबद्दल वाशीच्या लोकनियुक्त सरपंच गीता लोहार यांनी फौंडेशनचे आभार मानले.शाळेची विद्यार्थ्यांनी वैष्णवी येटाळे हीने शाळेतील मुलींना येणाऱ्या आडचणी सोडवण्याची मागणी केली.

शिक्षक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, मुख्याध्यापिका तोडकर यांनी प्रास्ताविक केले. गुजर, ग्रा.पं.सदस्य श्रीधर कांबळे, सागर चपाले, सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. जाधव यांनी आभार मानले.

यावेळी बेटी बचाव फाऊंडेशनचे सर्व मान्यवर, उपसरपंच संगीतापाटील, ग्रा.पं. सदस्य शरद पुजारी, दिपाली पाटील, येसाबाई पुजारी, विजय कांबळे, माजी उपसरपंच अरुण मोरे, कन्या शाळा कमिटी अध्यक्ष के.एस.रानगे, कुमार शाळा कमिटीचे अध्यक्ष पांडूरंग तिबीले, शाळा व्यवस्थापन कमिटीचे सर्व सदस्य, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

डी. वाय. पाटील कारखान्‍याच्‍यावतीने गगनबावडा पूरग्रस्‍तांसाठी यांत्रिक बोटी प्रदान

Abhijeet Shinde

कोरोची गावाला दिलासा ; 6 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Abhijeet Shinde

रेव्याचीवाडी येथे शेतीपिकांचे नुकसान

Abhijeet Shinde

कापशीतील साडेसात वर्षाच्या बालकाला अज्ञाताने पळवले

Abhijeet Shinde

केआयटीच्या विद्यार्थ्यांची सिरम इन्स्टिट्यूटमध्ये निवड

Abhijeet Shinde

चंदूरात एका दिवसात 13 पॉझिटिव्ह,तर एक म्युकर मायकोसिस रुग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!