तरुण भारत

जिल्हा युवा महोत्सव गुरुवारपासून

जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून आयोजन,
स्पर्धकांना लिंकवर लाईव्ह सादरीकरण करावे लागणार,
प्रथम क्रमांक पटकावणारा कलाकार विभागीय स्पर्धेठी पात्र ठरेल

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने १५ ते ३५ या वयोगटातील युवक-युवतींसाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहेत. शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन होईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली जाईल. या स्पर्धेअंतर्गंत लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका (इंग्रजी/हिंदी), शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी किंवा कर्नाटकी), सितार वादन, बासरी वादन, तबला वादन, विणा वादन, मृदूंग, हार्मोनियम (लाईट), गिटार, मनिपुरी नृत्य, ओडिशा नृत्य, भरतनाट्यम, कथ्थक, कुचिपुडी नृत्य या 17 कला प्रकारात स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांसोबतच वक्तृत्व स्पर्धा ही आयोजित केली जाणार आहे.

वरील प्रत्येक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारा कलाकार हा विभागीय युवा महोत्सवासाठी पात्र ठरवला जाईल. ज्यांना स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी २३ डिसेंबरपर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधून प्रवेशिका जमा करावी. प्रवेशिकेच्या नमुन्यासह अन्य माहिती घेण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या *dsokop.blogspot.com* या संकेतस्थळाला स्पर्धकांना भेट द्यावी लागेल.

स्पर्धकांना करावे लागेल लाईव्ह सादरीकरण
कोणकोणत्या कला स्पर्धेसाठी किती प्रवेशिका आल्या आहेत, याची पाहणी करून स्पर्धकांना एक लिंक दिली जाईल. या लिंकवर स्पर्धकांना लाईव्ह सादरीकरण करावे लागले. या सादरीकरणाचे परिक्षण जिल्हा क्रीडा कार्यालयातून केले जाईल. त्यासाठी त्या त्या कलाक्षेत्रातील जाणकारांना परिक्षक म्हणून निमंत्रित केले जाणार आहे, असे डॉ. साखरे यांनी सांगितले.

Related Stories

१५ जूनपर्यंत निर्बंध कायम

Abhijeet Shinde

जात,धर्मापेक्षा देशहित महत्वाचे

Abhijeet Shinde

शेळोशी धनगरवाड्यावर वनतळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

“ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना वीज बिलात सवलत द्या”

Abhijeet Shinde

आठ डिसेंबरच्या भारत बंदला मलकापूर व्यापारी बांधवांचा पाठिंबा

Abhijeet Shinde

गांधीनगरमध्ये बेकायदेशीररित्या ठेवी जमा करणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!