तरुण भारत

चिपळुणातील स्वराली तांबेचा सुवर्ण चौकार

चिपळूण

योगा फेडरेशन ऑफ इंडियांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन योगासन स्पर्धेत शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलची विद्यार्थिंनी स्वराली तांबे हिने सलग चौथ्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेतून तिची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली आहे.

Advertisements

5 डिसेंबर रोजी 14 वर्षाखालील मुली वयोगटात ऑनलाईन येगासन स्पर्धा घेण्यात आली होती. 45 खेळाडूंनी यात सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेदरम्यान स्वरालीने केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीमुळे तिला यंदाही सुवर्णपदक पटकावले आहे. स्वरालीने यापूर्वी सलग तीनवेळा सुवर्णपदक प्राप्त केले आहे. ती इयत्ता 3रीपासून पाग व्यायामशाळा येथे प्रशिक्षक रणवीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली योगासनाचे धडे गिरवत आहे. स्वराली हिची बहीण राष्ट्रीय योगपट्टू आर्या तांबे हिच्या पावलावर पाऊल ठेवत स्वरालीदेखील विविध पदकांची कमाई करीत आहे. या स्पर्धेनंतर तिची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.

स्वरालीच्या यशाबद्दल नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, मुख्याध्यापक कृष्णात शिंदे, स्कूल कमिटी चेअरमन आनंद साठे, विठ्ठल चितळे, क्रीडा शिक्षक सोमनाथ सुरवसे, समीर कालेकर यांनी सत्कार केला आहे.

Related Stories

अखेर लांजात महामार्ग कामाला मुहूर्त!

Patil_p

विशेष आर्थिक मदतीची पंतप्रधानांकडे मागणी करणार

Patil_p

शेजवलीत आढळले बिबटय़ाचे दोन बछडे

Patil_p

शिवसेनेच्या ‘चिल्लर गँग’ची स्वार्थी कोल्हेकुई!

NIKHIL_N

सिंधुदुर्गात अवैध पद्धतीची स्पिअर फिशिंग मासेमारी

NIKHIL_N

आठवडाभरात विजबिल माफ करा…अन्यथा ‘मनसे’ स्टाईल आंदोलन

Patil_p
error: Content is protected !!