तरुण भारत

महाराष्ट्र : 4,122 रुग्णांना डिस्चार्ज; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.03 %

ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रात मागील 24 तासात 4 हजार 122 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 17 लाख 94 हजार 080 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 94.03 % आहे.

Advertisements

 
दरम्यान, कालच्या दिवसात राज्यात 3,106 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 19 लाख 02 हजार 458 वर पोहचली आहे. सध्या 58 हजार 376 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 75 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 48 हजार 876 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.57 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 22 लाख 12 हजार 384 नमुन्यांपैकी 19 लाख 02 हजार 458 (15.58%) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 94 हजार 815 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 3 हजार 660 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

Related Stories

वनमंत्री संजय राठोड हाय हाय..!

triratna

सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरीमठातर्फे पोषणमूल्यआधारित शेती पद्धती उपक्रम

triratna

वर्ल्ड कपसाठी 13 रोजी नव्या जर्सीचे अनावरण

Patil_p

ग्रामपंचायतीच्या निवडणूकांना स्थगिती

Patil_p

शिरढोण मध्ये कोरोनाचा एक बळी

triratna

आग्र्यात भीषण अपघात; फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना कंटेनरने उडवले; 5 जण ठार

Rohan_P
error: Content is protected !!