तरुण भारत

यमकनमर्डी मतदारसंघात ग्रा. पं. साठी शांततेत मतदान

वार्ताहर/ यमकनमर्डी

यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील ग्राम पंचायत निवडणुकीसाठी तीव्र चुरस निर्माण झाली असून मंगळवारी सकाळी 7 ते 10 पर्यंत संथगतीने मतदान झाले. मात्र, त्यानंतर चुरसीने मतदान झाले. काही ठिकाणी किरकोळ वादावादी वगळता शांततेत मतदान झाले. निवडणुकीसाठी यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱयांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Advertisements

मतदान केंद्रात आशा-अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्राम पंचायत कर्मचारी, ग्राम विकास अधिकाऱयांनी जागृकतेने निवडणूक पार पाडली. उळ्ळागड्डी-खानापूर, चिकालगुड्ड, यमकनमर्डी, कोचरी, हंचिनाळ, गोटूर, हत्तरगी गावात मतदानासाठी चुरस निर्माण झाली होती. या गावांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्वीच पोलिसांनी खबरदारी घेत बंदोबस्त ठेवला होता.

हंचिनाळ, कोचरीसह काही गावांमध्ये 90 टक्क्यापेक्षा अधिक मतदान झाले. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर तीन तासांनी एका वृद्धाने व्हिलचेअरवरून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.­

Related Stories

केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या

datta jadhav

बीपी,शुगरअसणाऱ्या आशा सेविका कोरोना सर्व्हेत

Abhijeet Shinde

रांगेत थांबून टोल भरावा लागत असल्याने वाहनधारक संतप्त

Patil_p

सातारा : श्रेयसच्या भन्नाट कथेने उडाली बावधनकरांसह पोलिसांची ही तारांबळ

Abhijeet Shinde

1जून पासुन सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन त्वरीत रद्द करावा

Patil_p

नायगावची सर्व विकासकामे पूर्ण करु

Patil_p
error: Content is protected !!