तरुण भारत

ऐन लग्नसराईत ‘मण्णपुरम’चा दणका!

कर्मचारी संपावर गेल्याने शाखा बंद, दागिने अडकल्याने महिलावर्गात संताप, संबंधित खाते संपाबाबच अनभिज्ञ

प्रतिनिधी / रत्नागिरी

Advertisements

‘मण्णपुरम’ गोल्ड लोन कंपनीचे कर्मचारी संपावर गेल्याने ऐन लग्नसराईत अनेक ग्राहकांचे दागिने अडकून पडले आहेत. यामुळे महिला वर्गामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मण्णपुरमच्या बहुतांश शाखाच बंद असल्याने नेमका संपर्क साधायचा कुणाशी, असा प्रश्नही सर्वसामान्यांना पडला आहे. विशेष म्हणजे याची साधी खबरबातही संबंधित खात्याला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱयांच्या वेतनामध्ये कपात करण्यात आल्याच्या निषेधार्थ मण्णपुरम कामगार सेना या संघटनेच्यावतीने 18 नोव्हेंबरपासून हा संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मण्णपुरमच्या सर्वच शाखांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. बहुतांश शाखांना टाळे लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

मण्णपुरम कंपनीमध्ये अनेक लोक सोने तारण ठेवून कर्ज घेत असतात सध्या लग्नसराई व विविध कार्यक्रमांना सुरूवात झाल्याने तारण ठेवलेले दागिने परत मिळवण्याकडे या नागरिकांचा कल आहे. मात्र कंपनीचे कार्यालय बंद असल्याने ग्राहकांना जायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे या वादावर लवकरच तोडगा काढण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे

लॉकडाऊननंतर आर्थिक मंदीचे कारण देत कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात केली होती मात्र अनलॉकनंतर विविध कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार सुरु झाले. त्याचप्रमाणे मण्णपुरमच्या कर्मचाऱ्यांनाही पूर्ण वेतन मिळावे, अशी मागणी कामगार सेनेकडून करण्यात आली आहे त्यासाठी राज्यभर चालू असलेल्या संपाचा रत्नागिरी जिल्ह्यातही परिणाम दिसून येत आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना आपल्या हक्कापासून वंचित ठेवल्याचा आरोप कामगार सेनेकडून करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांची पगारवाढ रोखून धरण्यात आली आहे. अन्य राज्यात व शहरात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. हक्कांच्या सुट्टया काढून घेण्यात आल्या असून बळजबराने पगारामध्ये कपात करण्यात येत असल्याचे आरोप कामगार सेनेकडून करण्यात येत आहेत.

अधिकारीच अनभिज्ञ?
‘मण्णपुरम’मध्ये कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अनेक शाखा चक्क बंद आहेत. यामुळे ग्राहकांना हेलपाटे पडत आहेत त्यामुळे नाहक मनस्ताप होत आहे. मात्र याची साधी खबरबातही कामगार खात्याला नसल्याचे दिसून आले. काही ग्राहकांनी या विभागाशी संपर्क साधला असता या संपाबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगत कर्तव्यतत्परतेचा अजब नमुना पेश केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत मण्णपुरम प्रशासनाने तातडीने खुलासा करतानाच पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

सरकारने लक्ष घालावे

पासपोर्ट साईज फोटो घेणे – प्रसाद आठल्ये
‘मण्णपुरम’मध्ये दागिने तारण ठेऊन आम्ही काही रक्कम घेतली होती. त्याचा परतावा ऑनलाईन पध्दतीने निर्धारित वेळेत केला गेला आहे. सर्व रकमेचा परतावा  पूर्ण झाल्यानंतरही दागिने परत मिळत नसल्याने खूप अडचणी येत आहेत. कंपनी व्यवस्थापनाने व संबंधित शासकीय विभागाने यावर तातडीने उपाययोजर्ना करण्याची गरज आहे.
– प्रसाद अशोक आठल्ये, ग्राहक, खानू, ता. रत्नागिरी

Related Stories

लॉकडाऊनमध्येही साडेआठ हजार मे. टन आंब्याची निर्यात

NIKHIL_N

वेंगुर्ले उभादांडा किनाऱ्यावर दोन कासवांना जीवदान

Ganeshprasad Gogate

रद्द रेल्वे तिकिटांचा पूर्ण परतावा मिळणार

Patil_p

जिल्हय़ात 1 सप्टेंबरपासून 100 टक्के एसटी वाहतूक सेवा

Patil_p

रत्नागिरी : वाटद-खंडाळा येथे अति मद्यसेवनाने तरूणाचा मृत्यू

Abhijeet Shinde

जिह्यात कोरोना चाचण्यात घट , रूग्णसंख्येला आळा

Omkar B
error: Content is protected !!