तरुण भारत

कर्नाटकात मंगळवारी ११४१ बाधित रुग्णांची भर

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. त्याचबरोबर राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासन सज्ज असल्याचे सरकारने म्हंटले आहे. दरम्यान मंगळवारी राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. सोमवारी राज्यात ७७२ जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर मंगळवारी हीच संख्या १,१४१ वर पोहोचली. राज्यात सध्या १३,९९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान मंगळवारी राज्यातील विविध जिल्ह्यात १,१३६ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १२,०२९ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

राज्यात सर्वाधिक रुग्ण हे बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहेत. मंगळवारी जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढली असून ५८५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बेंगळूरमध्ये सक्रिय प्रकरणांची संख्या ९,१४८ आहे. जिल्ह्यात मंगळवारी ६८६ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर जिह्यात ८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ४,२८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

Related Stories

धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धीकडून 300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

Amit Kulkarni

राज्यात सक्रिय रुग्णसंख्या 76,505

Amit Kulkarni

डार्कनेटद्वारे ड्रग्स खरेदी करणाऱ्या दोन ड्रग पेडलरना अटक

triratna

सीबीआयची शिवकुमार यांना नोटीस

Patil_p

बेंगळूर: काँग्रेस आमदार शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी

triratna

1 जुलैपासून शाळा होणार सुरू

Amit Kulkarni
error: Content is protected !!