तरुण भारत

पाकिस्तानात अंडी 216 रुपये डझन

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

पाकिस्तानात महागाईचा विस्फोट झाला आहे. तेथे अंड्याचा होलसेल दर 197 रुपये डझन तर किरकोळ विक्रीचा दर 216 रुपये डझन आहे. पाकिस्तानात केवळ अंडीच नव्हे तर भाज्यांचेही दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.

Advertisements

पाकिस्तानात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हॉटेल आणि सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे पोल्ट्री फार्मही बंद आहेत. मात्र, थंडीत अंड्यांची मागणी वाढली असून, पुरवठा कमी आहे. त्यामुळे खुल्या बाजारात अंडी 216 रुपये दराने विकली जात आहेत.

मागील आठवड्यात आले 1 हजार रुपये किलो तर सिमला मिरची 200 रुपये किलोने विकली जात होती. इतर भाज्यांचे दरही जवळपास 200 रुपये किलोच्या आसपास आहेत. पाकिस्तानात गहू 80 रुपये किलोने विकला जात आहे. इम्रान खान यांच्या चुकीच्या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये महागाई वाढत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

Related Stories

तैवानवर हल्ला करण्याचा कट रचतोय चीन

Patil_p

कोरोनामुळे लसीकरण मोहीम रेंगाळली

Patil_p

ट्रम्प दौऱयापूर्वीच अमेरिकेने पाकिस्तानला खडसावले

tarunbharat

रशियात 70 शहरांमध्ये निदर्शने

Patil_p

158 देशांमध्ये फैलाव 6526 बळी

tarunbharat

पाकमध्ये 60 हिंदूंचे जबरदस्ती धर्मांतर

datta jadhav
error: Content is protected !!