तरुण भारत

सातारा : डबेवाडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ

कुत्र्याच्या हल्ल्यात डबेवाडीतील 3 महिला जखमी

परळी / वार्ताहर :

Advertisements

सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या डबेवाडी येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यांमुळे गावात दहशत पाहायला मिळत आहे. कुत्र्याने माणसांवर, गुरांवर तसेच शेळीवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच हल्ल्यातील जखमींना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, डबेवाडी येथील वंदना संजय रसाळ (वय 43), लिलाबाई लक्ष्मण माने (65) व संगीता दयानंद माने (42) या महिला कामानिमित्त घराबाहेर पडल्या असता, गावातील पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलांना कुटुंबीयांनी तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, सकाळी पळण्याचा सराव करणाऱ्या आंबवडे खुर्द येथील रवी किसन सुर्वे (29) यांच्यावरही कुत्र्याने हल्ला करुन जखमी केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Related Stories

माजी आमदारांसह 19 जणांवर खूनाचा गुन्हा

Patil_p

बायोमायनिंगही आता साशाच्या नावाने बनले कुरण

Patil_p

सरपंच परिषदेच्या सातारा तालुका उपाध्यक्षपदी हिंदुराव शिंदे

datta jadhav

सातारा : 49 नागरिकांना दिला डिस्चार्ज; उपचारा दरम्यान 1 मृत्यू

Abhijeet Shinde

सातारा : खूनप्रकरणी फलटणच्या एकास जन्मठेप

Abhijeet Shinde

रस्त्याची कामे भ्रष्टाचार मुक्त अन् दर्जेदार झाली पाहिजेत : गडकरी

datta jadhav
error: Content is protected !!