तरुण भारत

करवीरमधून पहिला अर्ज दाखल; सांगवडे ग्रामपंचायतीचा पहिला अर्ज

चूये / प्रतिनिधी

ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला आज पासून सुरुवात झाली असून अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी तालुक्यातून एक अर्ज दाखल झालेला आहे. सांगवडे ग्रामपंचायतीच्या विवेक चौगुले यांचा पहिला अर्ज दाखल झाला. दिवस अखेर फक्त एकच अर्ज निवडणुका कार्यालयामध्ये प्राप्त झालेला आहे.

करवीर तालुक्यातून 54 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून करवीर विधानसभा मतदारसंघातील 40 ग्रामपंचायती तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून 14 ग्रामपंचायतीची रणधुमाळी आजपासून सुरू झालेली आहे.

अर्ज दाखल करण्याची सुरुवात 23 तारखेपासून ते अंतिम तारीख 30 डिसेंबर असणार आहे पहिल्या दिवशी अनेक गावातून अर्ज प्राप्त होतील अशी अपेक्षा होती मात्र बहुतांशी गावात इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रे तयार करण्यातच आजचा पहिला दिवस घालविल्यामुळे फक्त एकच अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांच्या कडे प्राप्त झालेला आहे.

Advertisements

सांगवडे ग्रामपंचायतीने पहिल्या अर्जाचा मान मिळविला

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा पहिला दिवस होता.सात दिवसाचा अर्ज दाखल करण्याचा कालावधी असल्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी धूम धडाका होईल, अशी अपेक्षा होती. मात्र या कार्यालयाकडे फारशी गर्दी दिसलीच नाही. त्यामुळे पहिला अर्ज पहिल्या दिवशी दाखल करण्याचा मान फक्त सांगवडे गावाला मिळालेला आहे. या गावाने ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिल्या दिवसाचा प्रारंभ केलेला आहे.

Related Stories

कोरोना, महापुराचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे : आ. पी एन पाटील

Abhijeet Shinde

‘त्या ‘ बालकाच्या मदतीसाठी सरसावले बार्शीतले तरुण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : म.फुले स्मृतीदिनी शिक्षक दिन साजरा करावा

Abhijeet Shinde

सांगली जिह्यात दहा रूग्ण वाढले

Abhijeet Shinde

धामापूर येथे गव्याच्या हल्ल्यात एक जण जखमी

Abhijeet Shinde

मांढरदेव ट्रस्ट अध्यक्षपदी न्यायाधीश नकोत

Patil_p
error: Content is protected !!