22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

आगामी काळ खडतर : बायडेन

अमेरिकेत एक आठवडय़ात 16 लाख नवे रुग्ण

अमेरिकेत कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. 20 जानेवारी रोजी अध्यक्षपदाची शपथ घेणारे जो बायडेन यांनाही या संकटाची जाणीव आहे. आगामी काळ अत्यंत खडतर ठरू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेत आठवडाभरात 16 लाख नवे रुग्ण सापडले आहेत. कुठल्याही एका देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये इतकी भर दिसून आलेली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे. अमेरिकेत सर्वाधिक संकट कॅलिफोर्निया प्रांतात दिसून येत आहे. तेथील रुग्णालयांमध्ये आता बेड्स कमी पडू लागले आहेत. प्रांतात आठवडय़ात 5 लाख नवे रुग्ण आढळले आहेत.

कोरोनामुळे स्थिती कशाप्रकारे बिघडत आहे याची कल्पना नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांना आहे. बायडेन यांनी कोरोनाविषयक कृतिदलाचे सल्लागार डॉक्टर अँथनी फौसी यांच्यासोबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. नवे प्रशासनही सर्वप्रथम संक्रमणावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी काळ अत्यंत अडचणीचा ठरणार हेच सत्य आहे. कोविडविरोधातील लढाई लढावी लागणार असल्याचे बायडेन म्हणाले. फौसी यांनी मंगळवारी लस टोचून घेतली आहे. लाखो अमेरिकन लोकांनी लवकरात लवकर ही लस घ्यावी, ती अत्यंत सुरक्षित असल्याचे फौसी यांनी सांगितले आहे.

Related Stories

न्यूझीलंडमध्ये 102 दिवसानंतर आढळले कोरोना रुग्ण

datta jadhav

चीनच्या वाटेवर म्यानमारचे सैन्य?

Patil_p

फायझर लस नव्या कोरोनालाही मारक

Patil_p

जगभरातील बळींचा आकडा 50 हाजारांवर

Patil_p

कोरोनाचा वर्णभेद : बिगरश्वेतवर्णीयांना अधिक धोका

Patil_p

फ्रान्समध्ये कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 20 लाखांचा टप्पा

datta jadhav
error: Content is protected !!