तरुण भारत

कोरोना संकट : अमेरिकेच्या लोकसंख्येत नीचांकी वृद्धी

कोरोनाची स्पॅनिश फ्ल्यूच्या काळावरही मात : आकडेवारीतून स्पष्ट

कोरोना विषाणूने जगाला केलेले दंश दीर्घकाळापर्यंत वेदना देत राहणार आहेत. अमेरिकेत कोरोना विषाणूने स्पॅनिश फ्ल्यूच्या काळावरही मात केली आहे. अमेरिकेत 120 वर्षांमध्ये सर्वात कमी प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात 3,30,824 जणांचा मृत्यू ओढवला आहे.

Advertisements

अमेरिकेच्या लोकसंख्येचा वृद्धीदर मागील काही वर्षांपासून अत्यंत कमी वेगाने वाढत आहे. भारतासारख्या देशांच्या तुलनेत तर हा जवळपास स्थिरच आहे. तरीही मागील एक वर्षात वृद्धीदर अधिकच कमी झाला आहे. यामागील प्रमुख कारण कोरोना विषाणूचे संक्रमण असल्याचे जाणकारांचे मानणे आहे. हा आकडा देशात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱयांचा आकडा दर्शवित असल्याचा दावा लोकसंख्या विषयक तज्ञांनी केला आहे. मागील एक वर्षात लोकसंख्येचा दर कमी झाला आहे. कोरोना महामारीचा लोकसंख्येवर दीर्घकाळात कोणता प्रभाव पडणार हे यातून दिसून येत असल्याचे उद्गार संशोधक विलियम प्रे यांनी काढले आहेत. अमेरिकेत जुलै 2019 पासून जुलै 2020 दरम्यान लोकसंख्येच्या दरात 0.35 टक्क्यांची वृद्धी झाली आहे.

अमेरिकन पॉप्युलेशन ब्युरोनुसार एक वर्षात एकूण लोकसंख्येत 11 लाखांची भर पडली आहे. जुलै महिन्यात अमेरिकेची एकूण लोकसंख्या वाढून 32 कोटी 90 लाख झाली आहे. लोकसंख्येतील ही वृद्धी मागील एक दशकात नीचांकी राहिल्याचे विश्लेषणातून स्पष्ट होते. कोरोना विषाणू संक्रमणाने स्पॅनिश फ्ल्यूच्या काळालाही मागे टाकले आहे. तेव्हा 1918 ते 1919 दरम्यान लोकसंख्येत वृद्धीदर 0.49 टक्के राहिला होता.

अमेरिकेत लसीकरणही सुरू झाले आहे. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी काही दिवसांपूर्वी लस टोचून घेतली अहे. अशा स्थितीत अमेरिकेत आता कोरोनाबळींच्या संख्येत घट होऊ शकते. परंतु अमेरिकेत कोरोनाने घडवून आणलेल्या नुकसानीची भरपाई होण्यास दीर्घ काळ लागणार आहे.

अंटार्क्टिकातही कोरोनाचा शिरकाव : 36 जणांना कोरोनाची बाधा

कोरोना विषाणूपासून आतापर्यंत  अंटार्क्टिका खंड आतापर्यंत सुरक्षित राहिला होता. परंतु चालू आठवडय़ात कोविड-19 ने तेथेही शिरकाव केला आहे. तेथे चिलीच्या संशोधन केंद्रात कार्यरत 36 जणांचा कोरोना अहवाल होकारात्मक आला आहे.

संशोधन केंद्रात 36 जण बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. या बाधितांपैकी 26 जण सैनिक असून 10 जण दुरुस्ती पथकाचे सदस्य आहेत. या सर्व बाधितांना परत बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंटार्क्टिकात अनेक देशांची संशोधन केंद्रे असून तेथे महामारीच्या पार्श्वभूमीवर बंधनेही लागू करण्यात आली आहेत. महामारीमुळे संशोधनाच्या कामात अनेक अडथळे निर्माण होत आहेत.

पर्यटनावरही बंदी

महामारी फैलावल्यावर अंटार्क्टिकामध्ये पर्यटनावर बंदी घालण्यात आली होती. अधिकारी सातत्याने खंडाला कोरोनापासून बचावाचे प्रयत्न करत होते. 27 नोव्हेंबर रोजी चिलीमधून काही सामग्री अंटार्क्टिकात पोहोचली असून त्याच्याद्वारेच येथील संक्रमण फैलावले असावे. सामग्री पाठविण्यापूर्वी चाचणी करण्यात आली आणि सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला होता असा दावा चिलीच्या सैन्याने केला आहे.

Related Stories

‘राणी’ घेतेय हरवलेल्या मालमत्तेचे भाडे

Patil_p

नेपाळमध्ये 18 मेपर्यंत टाळेबंदी

Patil_p

कोरोना मुकाबल्यासाठी नॅनोस्पंज

datta jadhav

चीनने वाढवले संरक्षण बजेट

datta jadhav

भारताच्या शस्त्रास्त्र आयातीत 33 टक्क्यांची घट

Patil_p

तालिबानकडून घराघरातून मुलींचा शोध

Patil_p
error: Content is protected !!