तरुण भारत

अनिता देसाई ठरल्या कलाश्री बंबच्या मानकरी

50 हजारांचे पहिले बक्षीस : मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण

बेळगाव : येथील कलाश्री बंब आणि स्टील फर्निचरच्या पाचव्या सोडतीच्या मानकरी शहापूर येथील अनिता अनंत देसाई या ठरल्या आहेत. त्यांना मान्यवरांच्या हस्ते 50 हजार रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.

Advertisements

कलाश्री बंबचे मालक प्रकाश डोळेकर यांनी बक्षीस योजना व आपल्या व्यवसायाची माहिती देऊन मान्यवरांचे स्वागत केले.

शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन गोरल, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे महेश अनगोळकर, शिवसेनेचे अरविंद नांगनुरी यांची प्रमुख उपस्थिती होती. 2020 मधील या पाचव्या बंपर  सोडतीचे 50,000 रु. रोख रक्कम हे बक्षीस शहापूर येथील अनिता अनंत देसाई या सभासदाला लागले. तसेच श्रीदत्त अशोक पाटील (गर्लगुंजी), राजू कदम, सुळगे (हिं), यल्लापा शंकर डुकरे (धामणे), वेंकटेश विजय पाटील (ईदलहोंड), मोतीराम गुरव (आमटे, खानापूर), रमेश परशराम पाटील (बेळगाव) या सहा सभासदांना 5 लिटर कुकर गिफ्ट प्राईझ लकी  ड्रा मधून मिळाले. हणमंत सांबरेकर यांनी आभार मानले.

Related Stories

प्राथमिक आरोग्य केंद्रात आधुनिक सेवा पुरवा

Omkar B

कोनवाळ गल्ली नाल्याच्या कोसळलेल्या भिंतीचा खर्च पाण्यात?

Amit Kulkarni

आत्महत्या केलेल्या शेतकऱयाच्या कुटुंबियांना भरपाई द्या

Amit Kulkarni

हेस्कॉमच्या संजीव हम्मण्णावर यांचा सत्कार

Amit Kulkarni

थकीत प्रोत्साहन धन तातडीने द्या, अन्यथा काम बंद

Patil_p

बँकांच्या संपामुळे डिजीटल व्यवहारांना पसंती

Amit Kulkarni
error: Content is protected !!