तरुण भारत

यंदा अंबाबाई-जोतिबा चरणी 83 लाखांचे दागिने अर्पण

प्रतिनिधी / कोल्हापूर

यंदाच्या (2019-20) आर्थिक वर्षात अंबाबाई चरणी 191 तोळे सोन्याचे दागिने तर जोतिबा चरणी 28 तोळे दागिने भक्तांनी दान केले आहेत तर चांदीचा विचार केल्यास अंबाबाई चरणी 18 किलो चांदीचे दागिने तर जोतिबा चरणी जवळपास 8 किलो चांदीचे दागिने भक्तांनी अर्पण केले आहेत. याची किंमत जवळपास 83 लाख 76 हजार 99 इतकी झाली आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.

Advertisements

कोल्हापूर-करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि केदारलिंग जोतिबा चरणी मोठय़ा प्रमाणात भाविक सोने-चांदीचे दागिने दान करतात. 2019-20 च्या आर्थिक वर्षात भाविकांनी मोठय़ा प्रमाणात अंबाबाई आणि जोतिबाच्या चरणी सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले आहेत. अंबाबाई चरणी 191 तोळे सोन्याचे दागिने तर जोतिबा चरणी 28 तोळे दागिने दान केले आहेत तर अंबाबाई चरणी 18 किलो चांदीचे दागिने तर जोतिबा चरणी 8 किलो चांदीचे दागिने अर्पण केले आहेत.

यावर्षी 42 लाख 71 हजार रुपयांची दागिन्यांमध्ये घट

दरवर्षी अंबाबाई चरणी सोने चांदीचे दागिने दान केले जाते त्याचे मूल्यांकनही केले जाते. यावर्षी कोरोनामुळे मूल्यांकन उशिरा झाले. या वर्षीच्या मूल्यांकनानंतर मिळालेल्या आकडेवारीनुसार, गतवर्षी 2018-19 च्या तुलनेत यावर्षी 2019-20 आर्थिक वर्षात मोठी घट झाली आहे. जवळपास 42 लाख 71 हजार रुपयांची घट यावर्षीच्या दागिन्यांमध्ये झाली आहे.

गतवर्षी व यंदाच्या वर्षी भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदीचे दागिने

2018-19 या आर्थिक वर्षात 1 कोटी 26 लाख 47 हजार 505 रुपयांचे सोन्या चांदीच्या दागिन्यांचे अंबाबाई आणि जोतिबा चरणी दान झाले होते. तेच आता 2019-20 आर्थिक वर्षात 83 लाख 76 हजार 099 इतके दान झाले आहे. दागिन्यांच्या वजनानुसार विचार केल्यास गतवर्षी 2018-19 आर्थिक वर्षात अंबाबाई चरणी भाविकांनी 335 तोळ्यांहून अधिक सोने तर 16 किलो चांदीचे दान केले होते. तेच आता 2019-20 या आर्थिक वर्षात अंबाबाई चरणी 191 तोळे सोने तर 18 किलो चांदीचे भक्तांनी दान केले होते. त्याचबरोबर गतवर्षी 2018-19 आर्थिक वर्षात जोतिबा चरणी 17 तोळे सोने तर दीड किलो चांदीचे भाविकांनी दान केले होते. तर 2019-20 या आर्थिक वर्षात जोतिबा चरणी 27 तोळ्यांतून अधिक सोन्याचे दागिने तर जवळपास 8 किलो चांदीचे दागिने दान केले आहेत.

कोरोनामुळे मूल्यांकनास उशीर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव 

मूल्यांकन केल्यानंतर या सोने-चांदीच्या दागिन्यांची किंमत जवळपास 83 लाख 76 हजार 99 इतकी झाली आहे. दरवर्षी भक्तांनी दान केलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांचे मूल्यांकन केले जाते. यावर्षी कोरोनामुळे थोडा उशीर झाला आहे. शिवाय 2018-19 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2019-20 मध्ये मोठी घट झाल्याचे एकूणच आकडेवारीवरून दिसून आले आहे.

   
2019-20 या आर्थिक वर्षातील सोने-चांदी दागिन्यांचे मूल्यांकन


अंबाबाईला 191 तोळे सोन्याचे तर 18 किलो चांदीचे दागिने


जोतिबाला 28 तोळे सोन्याचे तर 8 किलो चांदीचे दागिने

Related Stories

शिरोली येथे ग्रामीण प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व्हावे

Abhijeet Shinde

गोकुळ निवडणूक : अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Abhijeet Shinde

कोडोलीत महालोक अदालत, ३० व्यक्तींनी केला गुन्हा कबुल

Abhijeet Shinde

रमेश कांदेकर बनले ‘कोरोना योद्धा’

Abhijeet Shinde

गावच्या विकासात मुश्रीफांचे मोलाचे योगदान : बाळासाहेब तुरंबे

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर लढवणार निवडणूक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!