तरुण भारत

फिलॅटली ब्युरोमुळे बेळगावचा इतिहास सर्वदूर पसरेल!

मुख्य पोस्टमास्तर शारदा संपत यांचे प्रतिपादन : हायटेक फिलॅटली ब्युरोचा उद्घाटन सोहळा, बेळगावच्या टपाल तिकिटांचे अनावरण

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेळगावमध्ये सुरू केलेला हायटेक फिलॅटली ब्युरो हा बेळगावच्या सौंदर्यात भर घालणारा आहे. यामुळे उत्तर कर्नाटकाला एक वेगळे अस्तित्व प्राप्त झाले आहे. बेळगाव विभागाने घेतलेल्या मेहनतीमुळे पुढील अनेक पिढय़ांना टपाल तिकिटांची माहिती घेता येणार आहे. बेळगाव परिसरातील अनेक ऐतिहासिक ठेवे टपाल तिकीट व पोस्ट कार्डच्या माध्यमातून जपले जातील, असा विश्वास राज्य पोस्ट विभागाच्या मुख्य पोस्टमास्तर शारदा संपत यांनी व्यक्त केला.

बेळगावमधील हायटेक फिलॅटली ब्युरोचा उद्घाटन सोहळा बुधवारी मुख्य पोस्ट कार्यालयात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर धारवाड विभागाच्या पोस्टमास्तर जनरल वीणा श्रीनिवास, बेळगाव विभागाचे पोस्ट सुप्रिटेंडंट एस. डी. कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी बेळगावच्या पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिर, सार्वजनिक वाचनालय, जैन बस्ती यासह इतर तिकिटांचे व पोस्ट कार्डांचे अनावरण करण्यात आले.

यावेळी वीणा श्रीनिवास म्हणाल्या, फिलॅटली ब्युरोमुळे केवळ टपाल तिकिटांचे जतन होणार नाही तर कर्नाटकची संस्कृती देशभर पोहोचणार आहे. बेळगाव विभागाने कोरोनाकाळात फिलॅटली ब्युरो सुरू करण्यासाठी परिश्रम घेतले. त्यामुळेच अनेक दुर्मीळ टपाल तिकिटांची माहिती मिळत असल्याचे सांगितले. प्रारंभी फीत कापून फिलॅटली ब्युरो हॉलचे उद्घाटन केले. या हॉलमध्ये खेळाडू, फळे, पक्षी, बालपण, टपाल खात्याचा इतिहास व महिला सशक्तीकरण असे विभाग केले आहेत. त्यानुसार टपाल तिकिटे ठेवली आहेत. यावेळी प्रसाद हिरेमठ, प्रशांत जेडी, कुबेर बोगार, अमित मांगले, अभिषेक पावसकर, सी. एम. केरीमठ, एम. के. कोत्तल, व्ही. एस. दासर, धर्मेंद्र जोई, पी. एस. कलपत्री व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

मनपा करणार व्यवसाय परवान्यांची तपासणी

Amit Kulkarni

शेवटचा श्रावण सोमवार शहर परिसरात उत्साहात

Amit Kulkarni

जिल्हय़ात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दक्षता

tarunbharat

कारवार जिल्हय़ातील शिवमंदिरे महाशिवरात्रीसाठी सज्ज

Amit Kulkarni

नोकरीत कायमस्वरुपी करून समान वेतन द्या

Omkar B

खानापूर दुर्गम भागातील विकासकामांचे ब्ल्यू प्रिंट तयार करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!