तरुण भारत

लॉकडाऊन काळात बेघर झालेल्या वृध्देची वृध्दाश्रमात रवानगी

डिचोली / प्रतिनिधी

  घरात मागेपुढे पाहणारा कोण नसल्याने राहत्या घरातून बेघर झालेल्या एका 75 वषीय वृध्द महिलेला डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यां?नी स्वतः पुढाकार घेत सर्व सरकारी सोपस्कार पूर्ण करून तिची म्हापसा येथे लोक सहायता संस्थेच्या वृध्दाश्रमात रवानगी केली. डिचोली तालुक्मयातील गोवा दोडामार्ग लाटंबार्से येथील सदर महिला असून तिने आपल्या या व्यवस्थेबद्दल मामलेदार पंडित यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Advertisements

   आजच्या आधुनिक दुनियेत लोकांना काही आपल्या मागील जमान्याचा जणू विसरच पडला आहे. असाच अनुभव वृध्द माणसांची होत असलेली आभाळ पाहिल्यानंतर येतो. अनेकांना आपल ज्यांच्या मांडीवर  लहानाचे मोठे झालोत आणि जगात फिरू लागलो, कमवू लागलो त्यांचाच विसर पडणे हि कल्पनाच असमर्थनीय आहे. असाच अनुभव गोवा दोडामार्ग लाटंबार्से येथील लिला बाबली ताळगावकर या 75 वषीय वृध्द महिलेच्या पदरी आला.

   लॉकडाऊन काळात एप्रिल महिन्यात एके दिवशी रात्री 12 वा. च्या सुमारास डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांना सदर प्रकाराची माहिती मिळली. त्यांनी तत्काळ सदर ठिकाणी जात लिला यांची विचारपूस केली. त्यांची घरात राहण्याबाबत समस्या निर्माण झाल्याने त्या बेघर झाल्याचे समजताच आता आय करणार या विवंचनेत असलेल्या मामलेदार पंडित यांनी लिला यांच्या राहण्याची सोय तात्पुरती बोर्डे डिचोली येथील संत गाडगेबाबा वृध्दाश्रमात केली.

   या वृध्दाश्रमाचे अध्यक्ष आनंद खांडेपारकर, उपाध्यक्ष अर्जुन माळगावकर, सचिव प्रकाश खांडेपारकर, खजिनदार दिलीप आमोणकर यांनी मामलेदार प्रवीणजय पंडित यांची विनंती मोठय़ा मनाने मान्य करत लिला यांना सदर वृध्दाश्रमात काहीच दिवसांसाठी मोफत ठेऊन घेतले. सदर वृध्दाश्रमात त्यांची सर्वतोपरी चांगली काळजी घेण्यात आली. या दरम्यान त्यांना सरकारी पातळीवर वृध्दाश्रमात पाठविण्यासाठी मामलेदार पंडित यां?नी कागदोपत्री प्रक्रिया सुरूच ठेवली. या कामी त्यांना मामलेदार कार्यालयाचे केशीयर राजेश गावकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

   लिला ताळगावकर यांना सरकारी पातळीवर वृध्दाश्रमात पाठविण्याचे सर्व ते सोपस्कार पूर्ण होऊन लिला यांच्या नावे लोक सहायता संस्था (प्रोवोदारीया) द्वारे एक आदेश आला. आणि त्यांना एक प्रतिज्ञापत्र सादर करून तत्काळ सदर संस्थेच्या वृध्दाश्रमात भरती होण्याची सुचना मिळाली. त्यानंतर मामलेदार कार्यालयाकडून त्यांची सदर वृध्दाश्रमात करण्यात आली. जाता जाता लिला यां?नी हात जोडून मामलेदार प्रवीणजय पंडित यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

   हातात असलेल्या पदावर राहून अडी अडचणीत असलेल्या लोकांना सहकार्य करण्याची संधी मिळणे म्हणजे या पदावरील कामाचे मनाला समाधान लाभते. या कामी बोर्डेतील संत गाडगेबाबा वृध्दाश्रमाच्या समितीने आपल्याला चांगली साथ दिली. तसेच सरकारी पातळीवरूनही या कामाच्या सोपस्कारात चांगले सहकार्य लाभले, असे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी सांगितले.

Related Stories

ऍड.अमित पालेकर यांचे आजपासून आमरण उपोषण

Amit Kulkarni

मयेवासीयांच्या स्वप्नातील विकासासाठी गोवा फॉरवर्ड मयेत

Amit Kulkarni

‘डीएसएसएस’चे पैसे ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात जमा करा

Omkar B

मुस्लिम बांधवांनी घरीच केला ईद

Omkar B

मार्ग अभियानचे संस्थापक स्वातंत्र्यसैनानी गुरूनाथ केळेकर काळाच्या पडदय़ाआड

Amit Kulkarni

म.गो नेते डॉ.केतन भाटीकर यांना अटक राजकीय हेतूने – दीपक ढवळीकर

Omkar B
error: Content is protected !!