तरुण भारत

आयुष्मान सहकारासाठी सामंजस्य कराराचे अनावरण

पणजी / प्रतिनिधी

केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी ’राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ’ (एनसीडीसी) आणि सहकारी संस्थांमधल्या ’एस व्यासा’ आयुष्मान सहकारासाठी असलेला सामंजस्य कराराचे बुधवारी अनावरण केले. देशात आयुर्वेद आणि इतर आयुष प्रणालींचा प्रचार करण्यासाठी भारत सरकारने प्राथमिकता दर्शवली आहे.  यासाठी 2014 मध्ये ’आयुष’चे स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे.

Advertisements

या अनावरणप्रसंगी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले,की  ’राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ’तर्फे युवा सहकाराच्या माध्यमातून सहकारी संस्थेत उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जात असल्याचे पाहून आपल्याला आनंद झाला.  आयुष्यमान सहकार तर्फे आरोग्य क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी केलेल्या  मदतीमूळे  ’आयुष’ क्षेत्राला निश्चितच योगदान लाभेल. समाजातीलसर्व घटकांचे कल्याण  करण्यासाठी  ’आयुष’ मंत्रालयाचे महत्त्व भारत सरकारने मान्य केले आहे.  ’आयुष्मान भारत’ योजने अंतर्गत सर्व राज्यात आणि संघप्रदेशात 2023-24  सालापर्यंत 12,500  ’आयुष हेल्थलँड वेलनेस’  केंद्र खोलण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.आत्तापर्यंत आयुष मंत्रालयाने  देशात 4,061 आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मंजुरी दिली आहे.  आयुष आरोग्य आणि निरोगीता केंद्रात  रोग-प्रतिबंधक उपाय आणि सकारात्मक आरोग्यास लाभ देणाऱया उपायांची अंमलबजावणी केली जाणार असून योग  विद्येचा या केंद्रात अविभाज्य भाग असणार आहे.

Related Stories

जगदीश फडके यांच्या नाटकुली संग्रहाचे 28 रोजी प्रकाशन

Amit Kulkarni

गोवा लुटण्यासाठीच विरोधक एकत्र

Amit Kulkarni

गोवा फॉरवर्डशी काँग्रेसची अद्याप युती नाही : चिदंबरम

Omkar B

तेव्हाच कोमपची संकल्पना पूर्णत्वास येईल !

Patil_p

पर्यटनात कुडचडेचे नाव देशभर होईल

Amit Kulkarni

कचऱयाची समस्या सोडविण्यासाठी लोकांचेही सहकार्य महत्वाचे

Amit Kulkarni
error: Content is protected !!