तरुण भारत

मिरजेतील भाजी मंडईसाठी आता नव्या जागेचा पर्याय

प्रतिनिधी/मिरज

मिरजेतील भाजी मंडईचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मी मिरजकर फाऊंडेशनने तात्पुरत्या भाजी मंडईसाठी पर्यायी जागांची चाचपणी सुरू केली आहे. फाउंडेशनने यापूर्वी रेवणी गल्लीतील शासकीय तंत्रनिकेतनच्या बंद गोडाऊनची जागा सुचविली होती. आता मिरज हायस्कुल रोडवरील देवल कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील मोकळ्या भूखंडाचा पर्यायपुढे आला असून, तेथे भाजी बाजार बसविण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.  आहे.

आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर आनंदा देवमाने यांनी मी मिरजकर फाउंडेशनच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी फाऊंडेशनच्या कार्यर्त्यांनी भाजी मंडईसाठी नव्या जागेचा प्रस्ताव मांडला. खंदकातील भाजी मंडईचे काम अपूर्ण आहे. खंदकात पाणी साचल्याने तेथे मंडईचे काम कधी पूर्ण होईल, याबाबत ठोस काही सांगता येत नाही. त्यामुळे शहरात तात्पुरत्या स्वरूपात भाजी मंडईसाठी जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे. यावेळी आयुक्तांनीही देवल कॉम्प्लेक्स पाठीमागच्या जागेचा प्रस्ताव मान्य केला. मात्र, सदर जागा महाराष्ट्र शासनाची असल्याने या जागेवर भाजी बाजार भरविण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतिक्षा आहे.

Advertisements

Related Stories

कोरोना योध्दयांचा सन्मान करणे आद्य कर्तव्य – मंत्री यड्रावकर

Abhijeet Shinde

आपण कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं प्रतिनिधित्व करत नाही – अजित पवार

Sumit Tambekar

पेठ वडगाव: वडगाव शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आ. राजूबाबा आवळे

Abhijeet Shinde

सांगली : शेती नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश

Sumit Tambekar

सरपंच आरक्षण सोडतीबाबत दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी पूर्ण : जिल्हाधिकारी शेखर सिंह

Abhijeet Shinde

पुण्यात विजबिलांची थकबाकी 1 हजार कोटींवर

Rohan_P
error: Content is protected !!