तरुण भारत

अभिनेता अर्जुन रामपालवर अटकेची टांगती तलवार

प्रतिनिधी / मुंबई

केंद्रीय अमली पदार्थ विरोधी विभागाने बॉलिवूडच्या ड्रग्ज तस्कराविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. याप्रकरणात अभिनेता अर्जुन रामपालवर अटकेची टांगती तलवार आहे. एनसीबीच्या छाप्यावेळी अर्जुनने प्रतिबंधित औषधांसंबंधी दाखविलेले डॉक्टरांचे प्रीक्रिप्शन जुने असल्याचे तपासात समोर आल्याने, एनसीबीने त्याच्या भोवती मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.

Advertisements

एका आफ्रिकन दलालामार्फत ऍजिसिलाओस डिमिट्रिटास याची माहिती मिळाली होती. एनसीबीने क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतफत्वात ऍजिसिलाओसला लोणावळय़ातील एका रिसॉर्टमधून अटक केली होती. ऍजिसिलाओसची बहीण गॅब्रिएला ही अर्जुनची मैत्रिण आहे. त्याच्याकडील माहितीच्या आधारे एनसीबीने अर्जुनच्या खार येथील घरी छापा टाकला. या छाप्यादरम्यान त्याच्या घरी प्रतिबंधित औषधे सापडली होती. त्यावेळी अर्जुनने ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेत असल्याचा दावा केला होता. परंतु, त्यात घोळ असल्याने एनसीबीने त्याला चौकशीला बोलविले असता, समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. यामुळे पुन्हा एकदा त्याची चौकशी करण्यात येणार आहे.

Related Stories

जम्मू काश्मीर : दिवसभरात 617 नवे कोरोना रुग्ण; 8 मृत्यू

Rohan_P

आसाममधील पूरग्रस्तांसाठी अक्षयकडून 1 कोटीची मदत

Patil_p

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली

datta jadhav

सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारत पात्र

Patil_p

हवेतून 10 मीटरपर्यंत पसरू शकतो विषाणू

Amit Kulkarni

कर्ज फेडता न आल्याने जंगलात वास्तव्य

Patil_p
error: Content is protected !!