तरुण भारत

कसोटी मालिका विजयासाठी सर्वोत्तम कामगिरीची गरज

टॉरिंगा : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला शनिवारी 26 डिसेंबरपासून बे ओव्हल मैदानावर प्रारंभ होणार आहे. या मालिकेत पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी न्यूझीलंड संघाला सर्वोत्तम कामगिरी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कर्णधार केन विल्यम्सनने केले आहे. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत ही कसोटी मालिका होत असून सध्या या स्पर्धेच्या गुणतक्त्यात न्यूझीलंडचा संघ तिसऱया स्थानावर आहे. पाकविरूद्धची कसोटी मालिका न्यूझीलंडने 2-0 अशा फरकाने एकतर्फी जिंकली तर हा संघ आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत अंतिम फेरीसाठी फेव्हरिट ठरेल, असेही न्यूझीलंडच्या कर्णधाराने म्हटले आहे. न्यूझीलंड आणि पाक यांच्यातील आगामी कसोटी मालिका चुरशीची होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान न्यूझीलंडने गेल्या दोन कसोटीमध्ये समाधानकारक कामगिरी केली आहे पण पाकविरूद्धच्या कसोटी मालिकेत खेळपट्टीचा स्वभाव आणि वातावरण यांच्याशी न्यूझीलंडच्या खेळाडूंना जुळवून घेताना यावेळेचा प्रतिस्पर्धी संघ वेगळा असल्याची दखल घेणे जरूरीचे आहे. न्यूझीलंड संघाने अलिकडे विंडीजचा दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश करून आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळविले आहे. यजमान न्यूझीलंडने अलिकडेच तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पाकचा 2-1 असा पराभव केला आहे. या आगामी कसोटी मालिकेत पाकचे पहिल्या सामन्यात नेतृत्व मोहम्मद रिझवानकडे सोपविण्यात आले आहे. दुखापतीमुळे त्यांचा नियमित कर्णधार बाबर आझम उपलब्ध राहणार नाही.

Related Stories

युक्रेनची महिला टेनिसपटू उत्तेजक चाचणीत दोषी

Patil_p

टी-20 वर्ल्डकपसाठी अँडी फ्लॉवर अफगाणच्या क्रिकेट सल्लागार

Patil_p

बंगालच्या मनिंदरची चमक तरीही बेंगळूर बुल्स विजयी

Patil_p

वॉशिंग्टन सुंदरऐवजी जयंत यादवचा समावेश

Patil_p

सेबॅस्टियन व्हेटेलचा फेरारीला लवकरच निरोप

Patil_p

भारतासाठी आज अस्तित्वाची लढत

Patil_p
error: Content is protected !!