तरुण भारत

तामिळनाडू संघाचे नेतृत्व दिनेश कार्तिककडे

चेन्नई : 10 जानेवारीपासून सुरू होणाऱया सय्यद मुश्ताक अली चषक टी-20 स्पर्धेसाठी तामिळनाडू संघाचे नेतृत्व फलंदाज आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तिककडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी तामिळनाडू क्रिकेट संघटनेने 20 जणांचा संघ जाहीर केला आहे. अष्टपैलू विजय शंकरकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या तामिळनाडू संघाचे सामने 10 ते 19 जानेवारी दरम्यान कोलकाता येथे खेळविले जातील. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचे सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर 26-27 जानेवारीला, उपांत्य फेरीचे सामने 29 जानेवारीला तर अंतिम सामना 31 जानेवारीला खेळविला जाईल.

तामिळनाडू संघ- दिनेश कार्तिक (कर्णधार), विजय शंकर (उपकर्णधार), बाबा अपराजित, बाबा इंद्रजीत, अश्विन क्रिस्ट, एम. मोहम्मद, जी.पेरियासामी, संदीप वॉरियर, कौशिक, सोनु यादव, एम. अश्व़िन, एम. शाहरूख खान, हरी निशांत, अरूण कार्तिक, प्रदोष रंजन पॉल, जगदीसन, साई किशोर, एम. सिद्धार्थ, सुर्यप्रकाश आणि जगन्नाथ श्रीनिवास.

Advertisements

Related Stories

भारतीय मुष्टियोद्धय़ांसाठी यंदा भरगच्च हंगाम

Omkar B

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका पाच सामन्यांची हवी : वॉर्न

Patil_p

स्वीडनमधील स्पर्धेत नीरज चोप्रा विजेता

Patil_p

एजबॅस्टन स्टेडियमवर कोव्हिड-19 एनएचएस स्टाफसाठी चाचणी केंद्र

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाचा चिली वरिष्ठ संघावर विजय

Amit Kulkarni

नॅशनल क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदी व्हीव्हीएस लक्ष्मण- गांगुली

Patil_p
error: Content is protected !!