तरुण भारत

कॅपिटल वन संस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात

बेळगाव : ‘कॅपिटल वन’ या संस्थेची 12 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेच्या मुख्य कार्यालयात उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव हंडे होते.

संस्थेकडे 2019-20 या आर्थिक वर्षात 19.13 कोटी ठेवी तर 23.99 कोटी खेळते भागभांडवल आहे. संस्थेची 112.49 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असून 16,01,762.83 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना 8 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. कॅपिटल वन या संस्थेचे ब्रीदवाक्मय ‘सगळय़ांसाठी सगळं काही’ याचा अर्थ सार्थ ठरवत कोविड-19 महामारीच्या काळात संस्था सभासदांच्या पाठीशी भक्कम राहिली. संस्थेने आर्थिक उलाढालीबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील आपले कार्य अखंडितपणे सुरू ठेवले आहे.

Advertisements

प्रारंभी संस्थेच्या मुख्य व्यवस्थापक राजश्री हुंदरे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी शिवाजीराव हंडे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन शाम सुतार, संचालक रामकुमार जोशी, संजय चौगुले, शिवाजीराव अतिवाडकर, सदानंद पाटील, शरद पाटील, भाग्यश्री जाधव, नंदा कांबळे यांसह भागधारक उपस्थित होते.

Related Stories

आम्ही कदापीही जमीन देणार नाही

Patil_p

पोदार स्कूलतर्फे सायक्लोथॉन उत्साहात

Amit Kulkarni

महनियांनी मराठी भाषा-संस्कृतीची ज्योत तेवत ठेवली

Amit Kulkarni

मोतीडोंगरावरील व्यक्तीस अटक करुन सोडले

Patil_p

कलमठ रोडवर मटका घेणाऱ्या तिघा जणांना अटक

Patil_p

कुपोषित बालकांची संख्या घटविण्यासाठी प्रयत्न करा

Patil_p
error: Content is protected !!